ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे साईओ कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे (Transfer) सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, तत्पूर्वी 25 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यामध्ये, काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली, तर काहींना सचिवपदी जबाबदारी मिळाली होती. आता, आणखी आयएएस 5 (IAS)अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे साईओ कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. बी. एन. पाटील (आयएएस: नॉन-एससीएस: 2014), संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे. मंगेश जोशी (आयएएस: एससीएस: 2015), उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे बदली झाली आहे. यासह, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएएस: आरआर: 2020), यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे बदली करण्यात आली आहे.
कुशल जैन (आयएएस: आरआर: 2022), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर, रेवैया डोंगरे (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव यांना यवतमाळ येथे प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
हेही वाचा
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर, 93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?






















