एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Angadia extortion case: अंगडिया खंडणी प्रकरणात मला वरिष्ठांच्या दबावामुळे गोवण्यात आलं : सौरभ त्रिपाठी

ज्या अहवालाच्या जोरावर सौरभ त्रिपाठी यांना अचानक आरोपी बनवण्यात आलं त्याचा प्रत देण्याची मागणीही त्रिपाठींच्यावतीनं कोर्टात करण्यात आली.

मुंबई : अंगडिया खंडणी प्रकरणात (Angadia extortion case) आपल्याला वरीष्ठांच्या दबावामुळे गोवण्यात आल्याचा दावा निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी केला आहे. तसेच ज्या अहवालाच्या जोरावर सौरभ त्रिपाठी यांना अचानक आरोपी बनवण्यात आलं त्याचा प्रत देण्याची मागणीही त्रिपाठींच्यावतीनं कोर्टात करण्यात आली. मात्र तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असून हा अहवाल याचिकाकर्त्यांना देता येणार नाही असं तपासअधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलं. फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. गुरूवारी न्यायाधीश आर.एम. सदरानी यांच्यापुढे यावर सुनावणी पार पडली. त्रिपाठी यांच्यासाठी अनिकेत निकम युक्तिवाद करत असून शुक्रवारीही यावर सुनावणी सुरू राहील. 

अनिकेत निकम यांनी कोर्टाता दावा केलाय की, ओम वंगाटे हेच यामागचे सूत्रधार आहेत. त्यांनीच या अंगडियांना धमकावून त्यांच्याकडनं जबरदस्ती वसूली केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वंगाटे, कदम आणि जमदाडे या अटकेत असलेल्या पोलीस अधिका-यांनी पोलीस कस्टडीत असताना किंवा गुन्हा दाखल होण्याच्या आधी झालेल्या प्राथमिक चौकशीत कधीही सौरभ त्रिपाठींचं नाव घेतलेलं नाही. ज्या दिवशी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली त्यानंतर अचानक त्यांनी डीसीपींचं नाव घेतलं. तसेच याप्रकरणी दरोडेखोरीचा आरोप करत जी कलमं त्रिपाठींवर लावण्यात आलीत ती पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. सौरभ त्रिपाठींनी याप्रकरणी आपला प्राथमिक जबाबही नोंदवलेला आहे. ज्यात त्यांनी स्पष्ट केलंय की, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. 

डिसेंबर 2021 रोजी अंगडिया असोसिएशननं मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याशी संपर्क साधून डीसीपी त्रिपाठी यांच्यावर आरोप केला की, डीसीपी झोन 2 कडून व्यवसायिकांचा व्यवसाय सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 10 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आयुक्तांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी झोन 2 मधील एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनचे निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि पीएसआय समाधान जमदाडे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा, वंगाटे आणि एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या अधिकार्‍यांवर डिसेंबर महिन्यात अनेकवेळा अंगाडिया असोसिएनच्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची किंवा आयकर विभागाला त्यांच्या बेकायदेशीर कृतींबद्दल माहिती देण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 18 ते 20 लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. पुढील तपासांत त्रिपाठीविरोधातही खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकीय कारवाई म्हणून विभागीय चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला डीसीपींच्या निलंबनासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. 18 फेब्रुवारी रोजी त्रिपाठींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तेव्हापासून ते सेवेवर गैरहजर आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने (सीआयय़ू) त्रिपाठी यांना फरार घोषित केलेलं आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अखेर 20 मार्च रोजी डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनावर स्वाक्षरी केली.

कोण आहेत सौरभ त्रिपाठी 

त्रिपाठी, हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी असून एमबीबीएस आणि एमडी (त्वचाविज्ञान) पदवीधर असून त्यांनी मुंबईतील नायर रुग्णालयात शिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्यांनी डीसीपी झोन 4, वाहतूक पोलिसात डीसीपी, डीसीपी एसबी (1) म्हणून पदभार सांभाळला आहे, त्यापूर्वी अहमदनगरचे एसपी देखील होते. याप्रकरणानंतर त्यांची डीसीपी झोनमधून डीसीपी ऑपरेशन्स या पदावर बदली करण्यात आली होती परंतु फरार असल्यामुळे त्यांनी हा पदभार स्वीकारला नाही.

हे ही वाचा-

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Pushpa 2 Third Part Hint : पार्ट 2 मध्येच संपणार 'पुष्पा'ची कहाणी? सेटवरुन काढलेला शुटिंगदरम्यानचा शेवटचा फोटो व्हायरल
पार्ट 2 मध्येच संपणार 'पुष्पा'ची कहाणी? सेटवरुन काढलेला शुटिंगदरम्यानचा शेवटचा फोटो व्हायरल
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Embed widget