एक्स्प्लोर
विवाहबाह्य संबंध, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
पोलिसांनी या हत्येमध्ये आतापर्यंत योगेशची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह आणखी एकाला अटक केली आहे.
विरार (पालघर) : विरारमध्ये प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं उघड झालं. आरोपी हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात असतानाच गस्तीवरील पोलिसांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. योगेश राऊत असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून, तो विरारचा रहिवाशी होता.
अर्नाळा पोलिसांनी या हत्येमध्ये आतापर्यंत योगेशची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह आणखी एकाला अटक केली आहे. दीड लाखाला आपल्याच पतीची सुपारी पत्नीने दिली. योगेश राऊत असं मयताचं नाव आहे. तर तिच्या पत्नीचं नाव अश्विनी आहे.
हत्येनंतर मृतदेह बेडशिटमध्ये गुंडाळून पहाटे तीनच्या सुमारास आरोपी अॅक्टिव्हा गाडीवरून विरार पश्चिमेकडे रानपाडा परिसरात मृतदेह घेऊन जात होते. गस्तीवरील पोलिसांना संशय आला आणि अॅक्टिव्हा गाडीचा पाठलाग करुन, पोलिसांनी मृतदेहासह आरोपींना रंगेहात ताब्यात घेतलं आहे.
विरारच्या पश्चिम एम बी इस्टेट परिसरात राहणाऱ्या योगेश राऊत याचा विवाह दहा वर्षापूर्वी अश्विनीशी झाला. त्यांना एक आठ वर्षांचा आणि एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र योगेशच्या पत्नीचे राज अर्जुन याच्याशी विवाहबाह्य संबंध होते, आणि त्याची माहिती पती योगेशला लागली होती. त्यावरुन दोघांत नेहमी भांडणं होत होती.
पतीचा काटा काढण्यासाठी आपल्याच प्रियकराची मदत अश्विनीने घेतली. प्रियकराने त्याचा मित्र फैयाज आणि फैयाजचा मित्र जावेद याला योगेशला मारण्याची सुपारी दिली. सुपारी अडीच लाखाची होती, मात्र ती दीड लाखात ठरली. शुक्रवारी रात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान फैयाज आणि जावेदने योगेशची राहत्या घरातच ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement