महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर लोकं समाधानी; मुख्यमंत्री म्हणून 'या' नेत्याला सर्वाधिक पसंती : सर्व्हे
महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने एक सर्व्हे केला आहे.यात विविध प्रश्न विचारुन राज्य सरकारच्या कामावर जनतेची मतं जाणून घेतली होती.
मुंबई : महाविकासआघाडी सरकारने राज्यात नुकतीच वर्षपुर्ती केली आहे. या निमित्ताने 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने सरकारच्या कामगिरीवर सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यात सर्वसामान्यांना विविध मुद्द्यांवर, सरकारच्या कामगिरीवर काय वाटतं याचा उलगडा यातून झाला आहे. 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व विभागाचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. 10 हजार लोकांशी संवाद साधून काही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचले असल्याचं स्ट्रेलेमा संस्थेचे अध्यक्ष सुशील शिंदे यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी कशी वाटते? समाधानी आहे : 34 समाधानी नाही : 53 सांगता येत नाही : 13
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी कशी वाटते समाधानी आहे : 59 समाधानी नाही : 32 सांगता येत नाही : 9
भविष्यात तुम्हाला खालीलपैकी कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल
उद्धव ठाकरे : 24 अजित पवार : 21 देवेंद्र फडणवीस : 19 बाळासाहेब थोरात : 5 सांगता येत नाही : 17 यापैकी नाही : 14
गेल्या वर्षभरातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीविषयी आपण समाधानी आहात का? समाधानी आहे : 60 समाधानी नाही : 30 सांगता येत नाही : 10
कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारची कामगिरी कशी होती? लोकांना काय वाटत?
ठाकरे सरकार Ground Report : ठाकरे सरकारबद्दल काय जनतेच्या मनात काय? तुळजापुरातून स्पेशल रिपोर्ट