एक्स्प्लोर

हिट अँड रन : कारच्या धडकेत जखमी डॉ. दीपालीची मृत्यूशी झुंज अपयशी

मुंबईत भरधाव कारच्या धडकेत जखमी होऊन मृत्यूशी झुंज देणाऱ्या डॉ. दीपाली लहामटेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 मार्च रोजी आपल्या भावाला डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चाललेल्या दीपालीला मरीन ड्राईव्हवरच्या सिग्नलवर शिखा जव्हेरी या तरुणीने भरधाव गाडीने धडक दिली. पण सुमारे 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दीपालीची प्राणज्योत मालवली.

मुंबई : मुंबईत भरधाव कारच्या धडकेत जखमी होऊन मृत्यूशी झुंज देणाऱ्या डॉ. दीपाली लहामटेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 मार्च रोजी आपल्या भावाला डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी चाललेल्या दीपालीला मरीन ड्राईव्हवरच्या सिग्नलवर शिखा जव्हेरी या तरुणीने भरधाव गाडीने धडक दिली. पण सुमारे 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दीपालीची प्राणज्योत मालवली. येत्या काही महिन्यातच दीपाली डॉक्टर होणार होती. पण या अपघातानं लहामटे कुटुंब पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे. दीपालीच्या भावाने तिचे अवयव दान करणार असल्याचंही सांगितलं. दीपाली लहामटे ही नायर रुग्णालयाच्या दंतमहाविद्यालयात इंटर्न म्हणून काम करत होती. दीपालीच्या एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलेल्या भावाचं जे.जे. जिमखान्यात कॉन्व्होकेशन होतं. त्यासाठी गेल्या शनिवारी, म्हणजे 24 मार्चला ती पायी चालली होती. तारापोरवाला मत्स्यालयाजवळ असलेल्या सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर दीपाली रस्ता ओलांडत होती. त्यावेळी लाल सिग्नल असतानाही एका पांढऱ्या होंडा सिटी कारने सिग्नल तोडला आणि दीपालीला जोरदार धडक दिली. एफआयआरमध्ये असलेल्या माहितीनुसार शीखा झवेरी नामक महिला संबंधित कार चालवत होती. नेपियन्सी भागात राहणारी शीखा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अपघाताच्या वेळी तिच्यासोबत गाडीत तिची धाकटी मुलगीही होती. दुर्दैवाने त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अपघातानंतर जखमी दीपालीला वैद्यकीय मदत करण्याऐवजी शीखाने पळ काढला. एका व्यक्तीने पाठलाग करुन तिला पुढच्या सिग्नलवर गाठलं. काही पादचाऱ्यांनी दीपालीला भाटिया रुग्णालयात दाखल केलं. गेल्या शनिवारपासून दीपाली लाईफ सपोर्ट सिस्टमवर होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान आरोपी महिलाचालक जामिनावर बाहेर आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील किंवा कोणालाही या घटनेबद्दल माहिती असेल, तर त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन 'नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज स्टुडंट असोसिएशन'ने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं होतं. #JusticeForDeepali आणि #ThinkAndDrive अशा हॅशटॅगसह ही पोस्ट शेअर केली.

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget