एक्स्प्लोर
हिंदुजा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मनसे कामगार सेनेने हिंदुजा हॉस्पिटलला 24 तासात बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सुद्धा विचार करुन निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही निदर्शने करु अशी तंबी दिली आहे.
मुंबई : मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आज एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करत नसल्याने व्यवस्थापनाविरोधात अनेक कर्मचारी नाराज आहेत.
हिंदुजा हॉस्पिटलमधील जवळपास 250 कर्मचारी हे कंत्राटी म्हणून काम करतात. आम्हाला नियमानुसार कायमस्वरुपी कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी कर्मचारी हिंदुजा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडे गेल्या अनेक दिवसापांसून करत आहेत. मात्र हॉस्पिटलकडून कर्मचाऱ्यांना नकार मिळाला. त्यामुळे अनेक कर्मचारी निराश आहेत.
आज अशाच एका निराश कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. सचिन बीडलान या कर्मचाऱ्याने हॉस्पिटलमध्येच सकाळच्या वेळेला 11 वाजता विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ हिंदुजा रुग्णलयात पाहायला मिळाला.
दरम्यान, मनसे कामगार सेनेने हिंदुजा हॉस्पिटलला 24 तासात बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सुद्धा विचार करुन निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही निदर्शने करु अशी तंबी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement