उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विभागाच्या कार्यक्रमांचं आयोजन विद्यापीठानं करावं; युवासेनेची मागणी
मुंबई विद्यापीठासंदर्भातील विविध तक्रारींचे निवारण करण्याकरिता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी केली आहे.
![उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विभागाच्या कार्यक्रमांचं आयोजन विद्यापीठानं करावं; युवासेनेची मागणी Higher and Technical Education Minister Uday Samant departmental programs should be organized by the university demanded Yuvasena उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विभागाच्या कार्यक्रमांचं आयोजन विद्यापीठानं करावं; युवासेनेची मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/23110320/Mumbai-University-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई विद्यापीठासंदर्भातील विविध तक्रारींचे निवारण करण्याकरिता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी केली आहे. अभाविपाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराच्या कार्यक्रमाला विद्यापीठाने आयोजन करण्याबाबत केलेल्या विरोधानंतर युवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाला समर्थन दर्शविला आहे. या स्तुत्य उपक्रमास प्राधान्य देऊन हा जनता दरबार विविध जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र दिलं आहे. तर दुसरीकडे, मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी विद्यापीठवर भार टाकून विद्यार्थ्यांच्या पैशाचा अपव्यव टाळावा आणि विद्यापीठाकडून होणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या या कार्यक्रमला अभाविपकडून विरोध केला आहे.
22 फेब्रुवारीला उदय सामंत यांचा वरळी जंबोरी मैदान येथे कार्यक्रमच आयोजन आहे त्याबाबर सर्व आयोजनाची जबाबदारी मुंबई विद्यापीठ आणि एसएनडिटी विद्यापीठाने करावी असा पत्रक विभागाकडून काढण्यात आला होता. त्यानंतर त्याला झालेल्या विरोधानंतर युवासेना सिनेट सदस्यांनी याबाबत कुलगुरूंना पत्र लिहून विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक-शिक्षक यांच्याविषयींचे प्रश्न सोडविण्यासाठी हा कार्यक्रम विविध जिल्ह्यात घेण्यात यावेत अशी मागणी मुंबई विद्यापीठचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे केली आहे.
सदर कार्यक्रमाचा खर्च हा मुंबई आणि SNDT विद्यापीठाने द्यावा असा अध्यादेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने दिला आहे.राजकीय कार्यक्रमांना महाविद्यालय ,विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणे ,विद्यार्थ्यांच्या पैशांतून वर्तमानपत्रात जाहिरात देणे त्याचसोबत होर्डिंग ,बॅनर अशा विविध माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी करवून घेणे हे चुकीचे आहे. शिवाय,विद्यापीठाच्या खर्चातून मंत्र्यांचे कार्यक्रम करणे म्हणजे पैशाचा/विद्यापीठाच्या पैशाचा अपव्यय आहे असे अभाविपने आरोप करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या अध्यादेशामध्ये कोल्हापुर, सोलापुर, गडचिरोली ई.विद्यापीठाने केलेल्या आयोजनाप्रमाणे मुंबई व SNDT विद्यापीठाने व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहे. महत्वाचे म्हणजे शासनाने विद्यापीठांना अशा प्रकारचे शासकीय कार्यकमाचे आयोजन करण्याचे आदेश देणे हे सर्वथा चुकीचे असल्याचं मत अभाविप व सिनेट सदस्यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)