एक्स्प्लोर
दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी अहवालावर हायकोर्टाची नाराजी
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या अहवालावर हायकोर्टानं सीबीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. दोन राज्यातून वेगवेगळे अहवाल प्राप्त झाल्याने निष्पक्ष बॅलेस्टिक अहवालाची प्रतीक्षा असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
फरारी आरोपींविरोधात काहीच का केलं जात नाही, असंही दाभोलकर आणि पानसरे यांच्या वकिलांनी विचारलं आहे. सारंग अकोलकर आणि विनय पवार हे 2009 पासून फरारी आहेत. बॅलिस्टिक रिपोर्टबद्दलच बोललं जातं, पण या फरारींबदद्ल काही केलं जात नाही, असं दाभोलकर आणि पानसरेंचे वकील अभय नेवगी यांनी कोर्टात म्हटलं.
कोर्टाने या अहवालावर नाराजी व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या तपास संस्थांमध्ये समन्वय नसल्यानं तपास पुढे जात नसल्याचं चित्र आहे, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement