एक्स्प्लोर

हायकोर्टाचा 'त्या' सहा नगरसेवकांसह शिवसेनेला तूर्तास दिलासा

यासंदर्भात हायकोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकेवर ऑगस्ट 2018 मध्ये सुनावणी होणार आहे. ही सुनावणी लवकर घेण्यासाठी मनसेने बुधवारी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली होती.

मुंबई : मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत दाखल झालेल्या 'त्या' सहा नगरसेवकांना आणि शिवसेनेला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा मिळाला. यासंदर्भात हायकोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकेवर ऑगस्ट 2018 मध्ये सुनावणी होणार आहे. ही सुनावणी लवकर घेण्यासाठी मनसेने बुधवारी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र यावर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ऑगस्टमध्ये होणारी ही सुनावणी लवकर जूनमध्ये घेऊ, असं सांगत हायकोर्टाने यावर कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय बेदायदेशीर असल्याचा दावा करत मनसेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. शिवसेनेत दाखल होण्याच्या या प्रक्रियेला कोकण विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली होती. मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडून शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांसह शिवसेना गटनेते यशवंत जाधव आणि कोकण विभागीय आयुक्तांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला चार अपक्षांचा पाठिंबा असून भाजपला एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पाठिंबा आहे. पुढे भांडुप पोटनिवडणुकीतील विजयाने भाजपचं संख्याबळ एकने वाढलं, भाजप डोईजड होऊ शकेल त्यामुळे शेवटी मनसेचे सहा नगरसेवक आपल्या बाजूला वळवले. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ तब्बल 94 वर पोहोचलं आहे. संबंधित बातम्या :

'त्या' ६ नगरसेवकांच्या बाबतीत दिलेला आदेश बेकायदेशीर : मनसे

तेव्हा तिजोरी उघडलेली, आता चोरी कशाला? : संदीप देशपांडे

मनसेच्या मुंबईतील 6 नगरसेवकांचा सेनाप्रवेश अधिकृत : सूत्र

'बहू भी कभी सास बनती है’, हे लक्षात ठेवा : बाळा नांदगावकर

कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार? 7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी! शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण? मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget