'पानिपत'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, पानिपतकार विश्वास पाटलांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना कुणीही त्यावर आपला अधिकार सांगणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त करत न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांनी सर्व प्रतिवादींना याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी सहा आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

मुंबई : पानिपत सिनेमाचा शुक्रवारी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात पानिपतकार विश्वास पाटील यांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांसह इतर निर्मात्यांनी आपली कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप करत विश्वास पाटील यांनी 'कॉपीराईट' कायद्याअंतर्गत कोर्टात याचिका दाखल केली आहे. आजवर केवळ आपणच मराठ्यांच्या या लढ्याला एक गौरवशाली लढा म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवली गेलेली दृश्य आणि घटना या आपण लिहिलेल्या कादंबरीतील कथेशी साम्य साधतात. त्यामुळे आपली परवानगी न घेता बनवलेला हा सिनेमा आपल्याला एकदा दाखवावा किंवा प्रदर्शनाआधी त्याची स्क्रीप्ट आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.
मात्र याचिकाकर्त्यांचा दावा अमान्य मुंबई उच्च न्यायालयाला अमान्य आहे असं स्पष्ट करत, ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना कुणीही त्यावर आपला अधिकार सांगणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त करत न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांनी सर्व प्रतिवादींना याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी सहा आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. 1988 साली विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या पानिपतच्या आजवर 42 आवृत्या आल्या आहेत. तसेच ही कादंबरी विविध भाषांत भाषांतरीत करण्यात आली आहे. त्यावर आधारित 'रणांगण' या नाटकाचे 400 हून अधिक प्रयोग झालेत. त्यानंतर जर निर्मात्यांच्या दाव्यानुसार आता पानिपतवरच्या लढाईवर आधारीत एक नवी कथा जर लोकांना पाहायला मिळणार असेल तर आनंदच आहे, अशी भावना विश्वास पाटील यांनी एबीपी माझाकडे बोलताना व्यक्त केली.
निर्माता दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत या भव्य सिनेमामध्ये पानिपत कांदबरीतील घटना आणि तपशीलाचे विनापरवानगी घेण्यात आली आहे. या पानिपतकार विश्वास पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने गोवारीकर यांच्यासह सर्व पक्षकारांना दिले होते. त्यानुसार उत्तरांचा भला मोठा संच मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या पानिपत या कांदबरीवरुन सिनेमाची निर्मिती केली आहे, मात्र याची परवानगी घेण्यात आली नाही, असा आरोप पाटील यांनी न्यायालयात केला आहे. या कांदबरीसाठी आपण आठ वर्ष संशोधन केले आणि त्यानंतर उपलब्ध साहित्य आणि आपली आकलन क्षमता यावर आधारित संकल्पनेतून पानिपतची निर्मिती झाली असा त्यांचा दावा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
