एक्स्प्लोर

व्यभिचारी ठरवून देखभाल खर्च का नाकारला? हायकोर्टाने झापलं

पतीने केलेल्या घटस्फोट याचिकेनुसार फॅमिली कोर्टाने 2014 मध्ये महिला आणि तिच्या मुलाला देखभाल खर्च नाकारला.

मुंबई : महिलेला व्यभिचारी ठरवणाऱ्या कुटुंब न्यायालयाला मुंबई हायकोर्टाने चपराक लगावली आहे. महिलेला व्यभिचारी ठरवताना ती परपुरुषासोबत राहत असल्याचा पतीचा दावा नाकारणाऱ्या तीन गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. कुठल्याही पुराव्याविना तिला देखभाल खर्च नाकारल्याप्रकरणी जस्टिस शालिनी फणसाळकर-जोशी यांनी फॅमिली कोर्टाला झापलं आहे. एखाद्या महिलेच्या चारित्र्याविषयी बोलताना न्यायालयाने पुरेशी काळजी घेणं आवश्यक होतं, असं मतही कोर्टाने न्यायाधीशांनी व्यक्त केलं. पतीने केलेल्या घटस्फोट याचिकेनुसार फॅमिली कोर्टाने 2014 मध्ये महिला आणि तिच्या मुलाला देखभाल खर्च नाकारला. पोलिस कॉन्स्टेबल पतीने आपली पत्नी परपुरुषासोबत राहत असल्याचं याचिकेत म्हटलं होतं. घटस्फोट हा पतीपासून विभक्त राहत असल्यामुळे मंजूर झाला होता, व्यभिचारी असल्यामुळे नाही, असं जस्टिस यांनी ठणकावून सांगितलं. घटस्फोट मंजूर झाला म्हणून ती महिला व्यभिचारी असल्याचं मानून तिला देखभाल खर्च नाकारणं अत्यंत चुकीचं असल्याचं जस्टिस म्हणाल्या. 1990 मध्ये पतीने पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप केल्यानंतर दोघं वेगळे राहायला लागले. 1998 मध्ये कोर्टाने पत्नी व्यभिचारी असल्याचा दावा नाकारला आणि पतीने तिला आणि मुलाला देखभाल खर्च द्यावा असे आदेश दिले. 2006 मध्ये फॅमिली कोर्टाने त्याला घटस्फोट मंजूर केला. पत्नी विलग झाल्यामुळे फॅमिली कोर्टाने हा घटस्फोट मंजूर केला, मात्र पुन्हा व्यभिचाराचे आरोप फेटाळले. जिल्हा न्यायालयानेही पतीचा व्यभिचाराचे दावा फेटाळला. आठ वर्षांनंतर, 2014 मध्ये मात्र फॅमिली कोर्टाने महिला व्यभिचारी असल्याचं ठरवत (त्यावेळी 45 वर्षांच्या) महिलेला देखभाल खर्च रद्द केला. महिलेचे ज्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा पतीने केला होता, त्या पुरुषाकडून या नात्याची कबुली देणारं प्रतिज्ञापत्र पतीने सादर केलं. मात्र तो कोर्टात हजर राहिला नाही. महिलेने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. त्यावेळी व्यभिचारी ठरवत तिला देखभाल खर्च नाकारणं अवैध आणि अन्यायकारक असल्याचं हायकोर्टाने म्हटलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget