एक्स्प्लोर

ठाण्यातील बस स्टॉपवरील अनियमित जाहिरातींबाबत काय कारवाई केली? हायकोर्टाचा एसीबीला सवाल

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात एकूण 470 बसथांबे आहेत. त्यापैकी 55 टक्के बस थांब्यांवर जाहिरातींचे फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र अडीच टक्के बस स्टॉपचंच शुल्क मिळाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

मुंबई : ठाण्यातील बस स्टॉपवर लावलेल्या अनियमित जाहिरातींचं प्रकरण ठाणे महानगरपालिकेला भोवण्याची चिन्ह आहेत. यासंदर्भातील तक्रारीवर एसीबीने काय कारवाई केली, असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील बस थांब्यांवर झळकवल्या जाणाऱ्या जाहिरातींचे शुल्क योग्य प्रमाणात न भरल्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याच्या आरोप करत आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत ठाणे महापालिकेसह, राज्य सरकार आणि सोल्युशन अॅडव्हरटायझिंगला प्रतिवादी केले आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सोमवारी यावर सुनावणी झाली.

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात एकूण 470 बसथांबे आहेत. त्यापैकी 55 टक्के बस थांब्यांवर जाहिरातींचे फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र यापैकी केवळ अडीच टक्के बस थांब्यांचेच शुल्क महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे, असा आरोप या याचिकेतून केला गेला आहे.

याबाबत महापालिकेने जाहिरात कंपनी 'मे सोल्युशन्स अॅडव्हरटायझिंग' ला नोटीसही बजावली होती. मात्र तरीही त्याबाबत विशेष कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ठाणे महापालिकेच्या नोटीसीनुसार बुडविलेल्या कोट्यवधी रक्कमेचा महसूल तात्काळ जमा करण्यास सांगण्यात आले होते. तसे न झाल्याने थेट लाचलुचपत विभागाने याबाबत कारवाई करुन चौकशी करावी आणि गुन्हा नोंदवावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

एसीबीचे माहिती अधिकारात मिळालेले पत्रही कोर्टात दाखल करण्यात आले. एसीबीने याबाबत आतापर्यंत कोणती कारवाई केली? अशी विचारणा करत हायकोर्टाने 22 ऑक्टोबरला होणाऱ्या पुढील सुनावणीत प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
Raj Thackeray 2008 Railway Case: गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
गेल्या सुनावणीत म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही; आज राज ठाकरे पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
Amul Milk Price Hike : महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चर्चा असतानाच अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
महागाईचा भडका,अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
 Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्र्यानंतर RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता, RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचे सूचक वक्तव्य
Embed widget