एक्स्प्लोर

महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar on loan waiver :  महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता, तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. तर प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर नातू आणि आमदार रोहित पवार यांचे अभिनंदन केले आहे. 

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

सततच्या नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतू, सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने 2019 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना  50  हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2025-26, 2026-27 चे पिककर्ज भरण्याची घातलेली अट यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता. राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत आज शासनाने दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण  निर्णय  घेतला त्याबद्दल सरकारचे आभार असे शरद पवार म्हणाले. या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना त्यांचे नेते ,राजकिया पक्ष त्यांचे नेते तसेच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. 

 

उशिरा का होईना सरकारने अखेर आज या जाचक अटी शर्ती काढल्या, सुप्रिया सुळेंनी मानले सरकारचे आभार

शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु मागील काही वर्षातील अतिवृष्टी  दुष्काळ, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, वाढती महागाई, खते, औषधे, बियाणे यांचा वाढता खर्च अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची गरज असताना देखील शासनाने कर्जमाफी योजनेत जाचक अटी टाकल्या होत्या. पण उशिरा का होईना सरकारने अखेर आज या जाचक अटी शर्ती काढण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभार असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर या जाचक अटी काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आग्रही भूमिका मांडत आ.रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पंढरपूर ,छत्रपती संभाजीनगर येथे मोठे आंदोलन उभारले. छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनात मी स्वतः उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आणि सर्व शेतकरी  संघटना ,राजकीय पक्षांनी एकजुटीने हा लढा लढला आणि जिंकला सुद्धा ,सर्वांचे अभिनंदन असे सुळे म्हणाल्या. 

कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दोन घोषणा

2008 मध्ये देशात कर्जमाफी झाली, त्यानंतर 2009 मध्ये कर्जमाफी करण्यात आली. त्यावेळी 2008 मध्ये ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना 2009 मध्ये वगळलं होतं. 2026-27 च्या कर्जाची परतफेड केली पाहिजे, अशी अट टाकली होती, ज्यांना प्रोत्साहनपर लाभ देतोय, त्यांनी कर्ज वेळेत भरलं पाहिजे अशी भूमिका त्यामागील होती, असं देवेंद्र फडणीस म्हणाले. सातत्यानं या संदर्भात अटी शर्थी आहेत, अशी मागणी होत होती. रणधीर सावरकरांच्या नेतृत्त्वात महायुतीचे आमदार भेटले आणि 50 हजारांची अट काढून टाका, अशी मागणी केली. मी त्यांना अट काडून टाकल्यानं 4-5 हजार कोटींचा बोजा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही अट आणली आहे, समजा एक लाखांपर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी फायदा न मिळणारे राहतात. सगळ्याचं मत होतं, 2 लाख शेतकरी का सोडता. मी आर्थिक शिस्त सांगत होते, ते लोक  मला व्यापक विचार केला पाहिजे होते, असं सांगत होते.

महात्मा फुले कर्जमाफीमधील योजनेतील जे लोक होते ज्यांना 50 हजारांपर्यंत कर्जमाफी म्हटलं होतं. त्यांना देखील 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. 2026-27 चा कर्ज भरण्यासंदर्भातील नियम वगळण्यात येईल. 2026 ला किती लोकांनी भरले याची माहिती आहे. 95 टक्के लोकांनी पैसे भरले. त्या अगोदरच्या तीन पैकी दोन वर्षात ज्यांनी पैसे भरले ते आता पात्र होतील, पहिल्यांदा असा निर्णय झाला आहे, यापूर्वी असा निर्णय झालेला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget