एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Rains | मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी, लोकलचाही खोळंबा
आजचा पाऊस नोव्हेंबर 2019 मधील पावसाचा विक्रम मोडणार असंच दिसत आहे. नोव्हेंबर 2010 मध्ये 47.2 मिमी पाऊसाची नोंद झाली होती. या महिन्यात मुंबईत आतापर्यंत 46 मिमी पाऊस पडला आहे.
मुंबई : मुंबईतील विविध भागात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई शहर तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. लालबाग, वरळी, सायन, वडाळा वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, घाटकोपर, बोरिवली दहिसरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पालघर, ठाणे, भिवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. ठाणे, भिवंडीतही विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु आहे. महा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस सुरु झाला.
मुंबईसह अनेक भागात दिवसभर पाऊस राहिल तर उद्या पाऊस उघडीप देईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. महा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. 2019 मध्ये पावसाचं ऋतुचक्र बदलल्याचं चित्र आहे. यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही पाऊस बरसत आहे. यावर्षी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातही पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाही.
आजचा पाऊस नोव्हेंबर 2019 मधील पावसाचा विक्रम मोडणार असंच दिसत आहे. नोव्हेंबर 2010 मध्ये 47.2 मिमी पाऊसाची नोंद झाली होती. या महिन्यात मुंबईत आतापर्यंत 46 मिमी पाऊस पडला आहे.
चक्रीवादळामुळे पाऊस
'क्यार' चक्रीवादळानंतर 'महा' चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झालं. मात्र, 'महा'ची तीव्रता 'कयार' या चक्रीवादळापेक्षा बरीच जास्त आहे. मान्सूनच्या परतीनंतर लागोपाठच्या चक्रीवादळांमुळे झालेल्या वातावरणातील बदलांनी राज्यात ऐन नोव्हेंबरमध्येही पावसाळी स्थिती आहे. 'महा' चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करत असल्याने महाराष्ट्रालाही त्याचा फटका बसत आहे.
लोकलचाही खोळंबा
एकीकडे पावसामुळे मुंबईकरांची दैना झाली असताना, लोकलची वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. माटुंगा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरु आहे. बिघाड दुरुस्त झाला असला तरी अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. तर रबाळेजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रान्सहार्बर रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाणे-वाशी रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कामाला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बातम्या
करमणूक
Advertisement