एक्स्प्लोर
वसई मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली, 400 जण अडकले
वसई : मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे वसई मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे. इथल्या 125 जणांच्या घरात पाणी शिरलं असून सुमारे 400 लोक अडकले आहेत.
अग्निशमन दलाच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. तर अग्निशम दलाने बोटीच्या साहाय्याने 25 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मात्र काही नागरिक घरी राहणंच पसंत करत आहेत.
दरम्यान, परतीच्या पावसाने वसई आणि विरारमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. विरार पूर्वमध्ये भाताणे पूल पाण्याखाली गेल्याने आजूबाजूच्या भाताणे, जाभूळपाडा, नवसई, तळ्याचा पाडा, हत्तीपाडा, काजूपाडा, आडने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील 24 तासात 115 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तसंच विरार पूर्वमधीलच फुलपाडा पापडखींड धरण भरल्याने आसपासचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement