एक्स्प्लोर

टीसीला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला परराज्यातून धमकीचे फोन; व्हिडीओ शेअर करत अनिकेत भोसले म्हणाला...

Mumbai Local TC Clashes: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्ये टीसी आणि प्रवाशामध्ये तुंबळ हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Mumbai Local TC Clashes वसई: चर्चगेट-विरार एसी लोकलमध्ये टीसी आणि प्रवाशामध्ये तुंबळ हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 15 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडल्याचे समोर आले होते. आता या व्हिडीओचे पडसाद शीख जनसमुदायात पसल्याचे दिसून येत आहे. 

टीसीच्या दाढीवर हात टाकल्याचा आरोप करत, शीख जनसमुदयाने अनिकेत भोसले याला सोशल मीडिया आणि फोनद्वारे धमकी येत असल्याचा सांगून, शीख समाजाची माफी मागितली आहे. प्रथम टीसीने मारल्याचं सांगत आपला कोणताही टीसीच्या दाढीला हात लावण्याचा इरादा नव्हता, असं संबंधित प्रवासी अनिकेत भोसले म्हणाला. तसेच विषय इथेच थांबवा, अशी विनंती देखील अनिकेत भोसले यांनी केली. आपल्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला पोलीस जबाबदार असतील असंही अनिकेत भोसले यावेळी म्हणाला.

अनिकेत भोसले परराज्यातून धमकीचे फोन-

सध्या या सर्व प्रकरणात नेमकी चूक कुणाची आहे याचा तपास हे रेल्वे पोलीस करत आहेत. टीसी आणि प्रवाशाचा वाद हा रेल्वे पोलिसांनी लेखी स्वरूपात लिहून दोघांनाही माफी मागण्यास सांगितलं होत. त्यात माफी मागून हा वाद मिटवला होता. मात्र सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सिख समाज आक्रमक झाला आहे. अनिकेत भोसले या राज्य-परराज्यातून धमकीचे फोन कॉल्स येत आहेत. सध्या हा रेल्वे प्रवाशी वादाची खंत व्यक्त करत मीडिया समोर येऊन जाहीर माफी मागत आहे.

टीसीने मोठं मन दाखवलं-

सदर हाणामारीत जसबीर सिंग यांनी इतर प्रवाशांकडून दंडात्मक स्वरुपात जमा केलेली रक्कम 1500 रुपयेही गहाळ झाल्याचे समोर आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ एसी लोकलमध्ये असलेल्या एका प्रवाशाने बनवला. जसबीर सिंग आणि 3 विनातिकीट प्रवाशांची हाणामारी सुरु होती. यानंतर आरपीएफचे काही अधिकारी लोकमध्ये दाखल झाले आणि प्रवासी अनिकेत भोसले याला नालासोपारा येथे लोकलमधून उतरवण्यात आले. या घटनेनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर 3 तरुण वटणीवर आले आणि त्यांनी आपली चूक मान्य केली. या घटनेत दसबीर सिंग यांचे गहाळ झालेले 1500 रुपये देखील जसबीर सिंग यांना परत केले आणि लेखी माफीनामा सादर केला. एफआयआर नोंदवला गेला तर त्याच्या नोकरीवर परिणाम होईल या हेतून जसबीर सिंग यांनीच मोठं मन दाखवत प्रवाशांवर गुन्हा न दाखल करत सक्त तकीद देऊन सोडले.

नेमकं काय घडलेलं?

चर्चगेट-विरार जलद एसी लोकल ट्रेनमध्ये गुरुवारी एका प्रवाशाच्या बेशिस्त वर्तनामुळे गोंधळ उडाला होता. या वादाचे रूपांतर रेल्वे टीटीसोबत हाणामारीत झाले. चर्चगेट ते विरार एसी लोकल ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढलेल्या तीन प्रवाशांनी मुख्य तिकीट निरीक्षकाला मारहाण केली. या घटनेदरम्यान, जसबीर सिंग हे किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ डब्यातील तीन प्रवाशांनी रेकॉर्ड केला होता. जसबीर सिंग यांनी या प्रवाशांना त्यांची तिकिटे दाखवण्यास सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिकीट चुकीचे असल्याचे समजल्यानंतर टीसीने त्यांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर अनिकेत भोसले नावाच्या प्रवाशाने सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकाऱ्याने त्यांना पुढील बोरिवली स्थानकावर ट्रेनमधून उतरण्यास सांगितले. मात्र भोसले यांनी नकार दिला वाद घातला आणि या वादाने रुपांतर हाणामारीत झाले होते.

संबंधित व्हिडीओ-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द, शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी
मोठी बातमी! मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द, शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
PM नरेंद्र मोदींच्या स्वागताची संधी, तेजस्विनी घोसाळकरांचा नमस्कार; म्हणाल्या, दहिसरच्या जनतेसाठी...
PM नरेंद्र मोदींच्या स्वागताची संधी, तेजस्विनी घोसाळकरांचा नमस्कार; म्हणाल्या, दहिसरच्या जनतेसाठी...

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
धक्कादायक, जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Embed widget