एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

खारफुटीच्या जमिनीलगत बफर झोनमध्ये केलेलं डंपिंग बेकायदेशीर : हायकोर्ट

वाढत्या लोकवस्तीचा विचार करता घनकरचा व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना करा, कोर्टाच्या आदेशांचा अवनान करु नका अन्यथा मुंबईप्रमाणे ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी आणू, असा स्पष्ट इशारा मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेला दिला आहे.

मुंबई : खारफुटीच्या जमिनीवर नव्हे, तर त्यापासून 50 मीटरवर असलेल्या बफर झोनमध्ये कुठेही कचरा टाकणार नाही असं लेखी आश्नासन द्या, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जायला तयार व्हा असे स्पष्ट निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेला बजावलं आहे. यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं, मात्र हे पुरेसं नसल्याचं सांगत हायकोर्टानं पालिकेला जणू धोक्याचा इशाराच दिला आहे. वाढत्या लोकवस्तीचा विचार करता घनकरचा व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना करा, कोर्टाच्या आदेशांचा अवनान करु नका अन्यथा मुंबईप्रमाणे ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी आणू, असा स्पष्ट इशारा मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेला दिला आहे. यासंदर्भात 23 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीला सविस्तर निर्देश दिले जातील असं हायकोर्टाने स्पष्ट केल आहे. गांवदेवी मित्रमंडळ या ठाण्यातील एका स्थानिक मंडळाने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्यावतीनं सध्या बेकायदेशीररित्या कोणतीही प्रक्रिया न करता कांदळवनाच्या जागेवर कचरा फेकला जातो. तसेच मोठ्या प्रमाणात कांदळवनाची कत्तल करून भूमाफिया जमीन बळकावून बेकायदेशीर बांधकाम करत आहेत असा आरोप ठराविक जागांचे फोटो दाखवून या याचिकेतून करण्यात आला. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या कारणामुळे साल 2016 मध्ये हायकोर्टानं बीएमसीला फटकारत मुंबईत नवीन बांधकामांवर बंदी आणली. मात्र यातून इमारतींचा पुनर्विकास, दुरुस्ती आणि नवीन हॉस्पिटल, शाळा, कॉलेज यांच्या उभारणीला वगळण्यात आलं आहे. नवीन डंपिंग ग्राऊंड कार्यान्वित होत नाही तोपर्यंत ही बंदी लागू राहील. ज्याला साल 2019 उजाडण्याची अपेक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget