एक्स्प्लोर

दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला हायकोर्टाचा हिरवा कंदील; विरोध करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली

Navratri 2022 : फाल्गुनी पाठक प यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, ती याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.

Navratri 2022 : दांडीया क्वीन फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या गरबा (Garba) कार्यक्रमाला हायकोर्टानं (High Court) हिरवा कंदिल दिला आहे. या कार्यक्रमावर आक्षेप घेत एका खेळाच्या मैदानाचं व्यावसायिकीकरण रोखण्याची मागणी करत हायकोर्टात  दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे बोरिवलीच्या (Borivali Ground) चिकूवाडी परिसरातील स्वर्गीय प्रमोद महाजन मैदानात यंदा फाल्गुनी पाठक यांचा दांडीया रास (Dandiya Raas) जोरदार रंगणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी ही याचिका दाखल करताना केवळ याचिकाकर्त्यांनी केवळ या एकाच कार्यक्रमाला का टार्गेट केलं आहे?, मुळात त्या परिसरात आसपासच्या मैदानांवर अनेक अश्याचप्रकारचे कार्यक्रम होतात. परंतु त्यांच्याबद्दल याचिकेत कुठेही उल्लेख केलेला नाही. साल 2019 मध्येही याचिकाकर्त्यांनी याच मुद्यावर अशीच याचिका केली होती, जी फेटाळण्यात आली तरीही याचिकाकर्त्यांनी पुन्हा तेच केलंय. तसेच याचिकाकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजक साई गणेश वेलफेअर असोसिएशन यांना यात प्रतिवादी का बनवलेलं नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना जनहीत याचिका घेऊन कोर्टात येणं अयोग्य आहे. त्यामुळे मुद्दा जरी योग्य असला तरी या याचिकेत आम्हाला तथ्य दिसत नाही, असा शेरा मारत मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्त आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली.

काय आहे याचिका?

मुंबई महानगरपालिकेनं (BMC) बोरीवली (Borivali) येथील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल (Late Shri Pramod Mahajan Sports Complex) येथील भुखंड खेळाचं मैदान म्हणून निश्चित केलेला आहे. पण, या मैदानावर नवरात्र उत्सवानिमित्त फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं होतं. याची नोंद घेत सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार विनायक सानप यांनी फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याच्या कार्यक्रमावर जोरदार आक्षेप घेतला होता. या कार्यक्रमासाठी 800 ते 4200 रुपयापर्यंत तिकिटाचे दरही निश्चित करण्यात आल्याचा आरोप करत या आयोजनाला याचिकेतून आक्षेप घेतला होता.

हे खेळाचं मैदान सर्वांसाठी खुलं असताना अशी प्रकारे तिथं कार्यक्रमाचं आयोजन करून त्याचं व्यावसायिकीकरण केलं जाऊ नये, अशी मागणी याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत संगीत कार्यक्रम अथवा नवरात्रोत्सवात गरब्यासाठी या क्रिडांगणाचा वापर होत असेल तर मैदानावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात यावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Vidhansabha : पक्ष जो आदेश देईल ते काम करणार, रवींद्र धंगेकर काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 17 June 2024Tryambakeshwar Mandir Devotees beat : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन रांगेत भाविकांना मारहाण झाल्याचा आरोपGaja Marne Video Viral : गजा मारणेचे  गुंडगिरीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
Team India : विराट ते हार्दिकसह यंग ब्रिगेडची बीचवर धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर, रोहित कुठंय नेटकऱ्यांचा सवाल
विराट कोहली, रिंकू सिंग ते हार्दिक पांड्या, बीचवर यंग ब्रिगेडची धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Rain Alert : आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
'डमी उमेदवार उभा करणे, आरोप करणे, हा त्यांचा जुनाच छंद'; किशोर दराडेंचा विवेक कोल्हेंवर पलटवार
'डमी उमेदवार उभा करणे, आरोप करणे, हा त्यांचा जुनाच छंद'; किशोर दराडेंचा विवेक कोल्हेंवर पलटवार
Embed widget