एक्स्प्लोर

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली

निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलण्याचा सध्या ट्रेंड सुरु आहे. मात्र या नेत्यांचा फैसला आगामी निवणुकीत मतदारच करतील. अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सध्याच्या पक्षबदलाच्या स्थितीवर आपली भावना व्यक्त केली आहे.

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलण्याचा सध्या ट्रेंड सुरु आहे. मात्र या नेत्यांचा फैसला आगामी निवणुकीत मतदारच करतील. आजचे मतदार हे फार सुजाण आहेत, त्यांना सर्व गोष्टी समजतात. या शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सध्याच्या स्थितीवर आपली भावना व्यक्त केली. साल 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर अनेकांनी सत्ताधारी भाजपकडे आपला मोर्चा वळवला. खासकरून विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या पक्षाशी असलेलं इमान सोडून आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढलं आहे. अशा गोष्टींचं समर्थन करताच येणार नाही. मात्र कायद्याने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करता येणार नाही. असे मत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं. मंत्रीमंडळ विस्तारप्रकरणी राज्य सरकारला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीतून सेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर आणि रिपाई नेते अविनाश महातेकर यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात नव्यान समावेश करण्यात आला. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या थेट मंत्रीमंडळात समावेश केल्याचा विरोध करत सामाजिक कार्यकर्ता संजय काळे, संदीप कुलकर्णी आणि सुरिंदर अरोरा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील विजय थोरात यांनी स्पष्ट केले की, संबंधित नेत्यांनी आपल्या पक्ष पदांचा आणि पक्षातील सदस्यपदाचा राजीनामा देऊनच नव्याने पक्ष प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही बंधनं नाहीत. तसेच कायद्यानं कुणालाही मंत्री बनवण्याची तरतूद केलेली आहे. मात्र संबंधित मंत्र्यांना सहा महिन्यांच्या आत निवडून येणं बंधनकारक राहील, त्यामुळे नवनिर्वाचित मंत्री आणि राज्य सरकारही त्याला बांधील राहील. त्यामुळे केवळ राजकीय हेतूने प्रेरित असलेली ही निरर्थक याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी हायकोर्टाकडे करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
Mumbai : धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget