एक्स्प्लोर

कोरोना काळातही डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नाही : हायकोर्ट

राज्य सरकारचं हायकोर्टात निव्वळ एक पानी तुटपूंज प्रतिज्ञापत्र सादर. आरोग्य विभागानं दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र कोर्टानं नाकारलं, पुन्हा नव्यानं सादर करण्याचे निर्देश.

मुंबई : रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होत असलेल्या हल्यांबाबत राज्य सरकारकडून समाधानकारक खुलासा न आल्यामुळे बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना काळातही डॉक्टरांना संरक्षण देण्याबाबत सरकार गंभीर दिसत नाही, असं मत यावेळी हायकोर्टानं व्यक्त केलं. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्षम करावी आणि डॉक्टरांना तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात डॉ. राजीव जोशी यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 27 मे रोजी होणार आहे.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी झाली. याचिकेत उपस्थित केलेल्या डॉक्टरांवरील हल्यांच्या घटनांबाबत सरकारने लेखी खुलासा करावा, असे निर्देश हायकोर्टानं मागील सुनावणीला दिले होते. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागातील उपसचिवांनी यावर केवळ एका पानाचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं. यामध्ये राज्यात अश्या एकूण 436 घटना आतापर्यंत घडल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली. तसेच यासंबंधी अस्तित्त्वात असलेल्या कायद्याची माहिती आहे का? असा सवाल करत या अपुऱ्या तपशीलाबाबत हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलं. इतक्या गंभीर विषयावर केवळ एक पानी प्रतिज्ञापत्र सादर होणं धक्कादायक आहे. पुढील वेळेस जोपर्यंत सरकारी वकील प्रतिज्ञापत्र तपासत नाहीत तोपर्यंत न्यायालय ते मंजूर करणार नाही, असा इशाराही हायकोर्टानं दिला. राज्य सरकार डॉक्टरांच्या संरक्षणाबाबत गंभीर नाही आणि डॉक्टरांनी मात्र सर्वस्व झोकून काम करावं अशी आशा व्यक्त करणं, हे खेदजनक आहे असंही खंडपीठानं म्हटलं.

याचिकाकर्त्यांनी केलेल्या सुचना, त्यावर सरकारनं केलेले उपाय आणि कारवाई या गोष्टींचा तपशील सरकारकडून अपेक्षित आहे. पुढील सुनावणीमध्ये पुन्हा नव्यानं प्रतिज्ञापत्रात दाखल करा, असे निर्देश हायकोर्टानं आरोग्य विभागाच्या सचिवांना दिले आहेत. ज्यात दिलेल्या आदेशांनुसार, राज्यात आतापर्यंत झालेल्या डॉक्टरांवर झालेल्या हल्यांच्या घटना, फौजदारी फिर्यादी, त्यावर करण्यात आलेली कारवाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून केलेले उपाय यांचा तपशील सविस्तरपणे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जर असे हल्ले होतच असतील तर ते सरकारचं अपयश असेल, असा शेरा हायकोर्टानं गेल्या सुनावणीमध्ये मारला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget