एक्स्प्लोर
हाच नवरा हवा! चौदाव्या वर्षी केलेलं लग्न तरुणीच्या इच्छेनुसार वैध
वकिलाविरोधात दाखल बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यास तूर्तास नकार देत त्यावरील सुनावणी सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
![हाच नवरा हवा! चौदाव्या वर्षी केलेलं लग्न तरुणीच्या इच्छेनुसार वैध HC accepts 18 years old girls application who was forced to marry 52 years old advocate when she was 14 हाच नवरा हवा! चौदाव्या वर्षी केलेलं लग्न तरुणीच्या इच्छेनुसार वैध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/26171445/Bombay-High-Court-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत एका 52 वर्षीय वकिलाने केलेला विवाह मुलगी सज्ञान होताच तिच्या इच्छेनुसार मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. हा निर्णय जाहीर करताना त्या मुलीने वयाची 18 वर्ष पूर्ण होताच या लग्नासाठी दिलेली मंजुरी आणि आरोपीसोबत नांदण्याची व्यक्त केलेली इच्छा ग्राह्य धरत तिच्यासाठी हेच योग्य असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं आहे.
'समाजात आता तिला कदाचित पत्नी म्हणून कुणीही स्वीकारणार नाही. तसेच तिच्या आरोपी पतीविरोधात आता पोलिसांनी कारवाई करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे तिने कोर्टाकडे केलेली विनंती मान्य करत असल्याचं हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. तसेच संबंधित वकिलाविरोधातील खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र त्या वकिलाविरोधात दाखल बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यास तूर्तास नकार देत त्यावरील सुनावणी सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
आरोपी वकिलाने या प्रकरणी दहा महिने कारावासाही भोगला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल याचिकेवर 2 मे रोजी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. त्या निकालाची प्रत सोमवारी उपलब्ध करण्यात आली.
संबंधित गुन्हा रद्द करण्यासाठी त्याच्या पत्नीने प्रतिज्ञापत्राद्वारे समंतीही दिली आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत हे प्रकरण गंभीर असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं. हा गुन्हा सहजासहजी रद्द केला तर समाजात चुकीचा पायंडा पडेल, असा युक्तिवाद सरकारी वकील अरुणा पै यांनी कोर्टात केला होता.
त्यानंतर संध्याकाळी आपल्या दालनात यासंदर्भातील निर्देश जारी करताना हायकोर्टाने वकिलाविरोधातील खटल्याच्या कारवाईला अंतरिम स्थगिती जरी दिली असली तरी त्याने मुलीच्या नावाने सुमारे 11 एकर जमीन, तिच्या शिक्षणाचा खर्च तसेच भविष्य निर्वाहासाठी सात लाख रुपये कायमस्वरुपी ठेव म्हणून जमा करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच या याचिकेवरील सुनावणी सप्टेंबरपर्यंत तहकूब करत गुन्हा रद्द करण्याबाबतचा निर्णय पुढील वर्षी होईल, असेही हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.
काय आहे प्रकरण?
बलात्कार आणि शारीरिक अत्याचाराच्या आरोपांबरोबर पोस्को अंतर्गत बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित आरोपी वकिलावर मुंबई पोलिसांनी काळाचौकी पोलिस स्थानकात डिसेंबर 2017 मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वकिलाने पीडित मुलीबरोबर विवाह केला त्यावेळेस ती केवळ 14 वर्षांची होती आणि आरोपी वकील 52 वर्षांचा होता.
आरोपी वकिलाची याच वयाची एक मुलगीही आहे हे विशेष. पीडित मुलीच्या आजी-आजोबांना त्याने सुमारे 6 एकर जमीन देऊन त्याबदल्यात या मुलीशी विवाह केला होता. मात्र मुलीच्या वडिलांचा या विवाहाला विरोध होता. आता मुलगी 18 वर्षांची झाली आहे. त्यामुळे आरोपी वकिलाने मुलीच्या संमतीपत्रासह आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. ज्यात मुलीने आपल्याला यापुढे आरोपी वकिलासहच संसार करायचा असल्याचं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)