Gunratna Sadavarte : शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी आणखी काही लोक ताब्यात; सदावर्तेंची कोठडी वाढवून मागणार
शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी आणखी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर केले जाणार आहे.
Gunratna Sadavarte Bail Update : शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर अटक केलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. पोलीस आज त्यांची कोठडी वाढवून मागणार आहेत. सदावर्ते यांना आज मुंबईत गिरगावमधील कोर्टात हजर केलं जाणार आहे. तिथं सदावर्ते यांना जामीन की पुन्हा कोठडी याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी काल सदावर्ते यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन तपास केला. परेल इथल्या क्रिस्टल टॉवरमध्ये जाऊन पोलिसांच्या टीमनं सीसीटीव्ही तपासून आंदोलनाआधी सदावर्ते यांची कुणी भेट घेतली होती का याचीही चौकशी केली.
दरम्यान शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी आणखी काही लोकांना ताब्यात घेतले आहेत. पोलीस काही पत्रकारांचा जबाब नोंदवण्याचीही शक्यता आहे. अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळं गिरगाव कोर्टाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आणखी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांनाही कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणी संपकरी कामगारांचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. शनिवारी सुट्टीकालीन कोर्ट कार्यरत असल्यानं त्यांना किल्ला कोर्टात नेलं होतं. कोर्टात हजर करण्यापूर्वी आरोपीची वैद्यकीय चाचणी आवश्यक असते. सूत्रांच्या माहितीनुसार सदावर्तेंची वैद्यकीय चाचणी काल रात्रीच पूर्ण करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रातच सदावर्तेंना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
काल गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यांच्या घराची झडती घेतली असल्याची माहिती आहे. यावेळी या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात येत असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेतली असल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या: