एक्स्प्लोर
Advertisement
'आरे'तील मेट्रो 3 कारशेडला राष्ट्रीय हरित लवादाचा हिरवा कंदील
लवकरच आरे कॉलनीतील प्रकल्पाच्या जागेत असणारी झाडं तोडणं, भराव टाकणं, डेब्रिज टाकणं ही कामे सुरु होतील.
मुंबई : आरे कॉलनीमधील 'मुंबई मेट्रो 3' च्या कारशेडबाबत सर्व कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत. काही सामाजिक संस्थांनी हरित लवादात कारशेड विरोधात याचिका केली होती, मात्र अंतिम निर्णयात या याचिका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरे कॉलनीत मेट्रो 3 साठी कारशेड बांधण्याला हिरवा कंदील मिळाला आहे.
या निर्णयामुळे लवकरच आरे कॉलनीतील प्रकल्पाच्या जागेत असणारी झाडं तोडणं, भराव टाकणं, डेब्रिज टाकणं ही कामे सुरु होतील. 'वनशक्ती आणि इतर विरुद्ध भारत सरकार' या अर्जावर राष्ट्रीय हरित लवादासमोर जुलै 2015 पासून सुनावणी सुरु होती.
अर्ज मागे घ्या, अन्यथा आदेश निर्गमित करुन अर्ज निकाली काढण्यात येईल असे निर्देश दिल्लीत झालेल्या अंतिम सुनावणीत राष्ट्रीय हरित लवादाच्या प्रमुख पीठाने अर्जदारांना दिले. त्यानंतर अर्जदार संस्था वनशक्तीने आपला अर्ज मागे घेतला आणि हे प्रकरण अंतिमतः निकाली निघाले.
याआधी 14 मे रोजी हरित लवादाने अंतरिम आदेश काढून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशला अंतिम आदेश होईपर्यंत सदर जागेत डेब्रिज टाकणे, भराव टाकणे आणि वृक्षतोड करणे यासाठी तात्पुरती मनाई केली होती. अर्जदारांकडून सातत्याने हरित लवादाच्या यापूर्वीच्या आदेशांचा हवाला देऊन या प्रकरणी 'जैसे थे' आदेश असल्याचा दावा केला जात होता.
राष्ट्रीय हरित लवादाच्या मुख्य पीठाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलं की अर्जदारांची प्रमुख विनंती ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती संवेदनशील क्षेत्र घोषित करणं अशी होती. मात्र केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे हे संवेदनशील क्षेत्र यापूर्वीच घोषित केलं होतं. त्यातून आरे येथील कारशेडचे क्षेत्र वगळलं असल्याने त्यांची मूळ विनंती निरर्थक ठरली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
हिंगोली
निवडणूक
Advertisement