एक्स्प्लोर
ओला-उबेरप्रमाणे टॅक्सीतही GPS अनिवार्य करणार : गृहराज्यमंत्री
टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत केली.
मुंबई : टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत केली.
ठाणे शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीबाबत विधानसभा नियम-105 नुसार लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात बोलताना त्यांनी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, कल्याण आदी शहरातील टॅक्सी-रिक्षाचालकांकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची अनेक उदाहरणे दिली.
रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट होणे, महिला प्रवाशांशी असभ्य वर्तणूक, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणे आदी घटना वारंवार घडतात. वाहनाला काळा-पिवळा रंग देऊन कोणतीही परवानगी न घेता टॅक्सी वाहतूकही केली जाते. रस्ते वाहतूक नियंत्रण जबाबदारी पोलिसांकडे असल्याने परिवहन विभाग यावर गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नाही आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले, टॅक्सीवर नजर ठेवण्यासाठी त्यामध्ये ओला-उबेरप्रमाणे जीपीएस यंत्रणा लावणे अनिवार्य करणार असल्याचे सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement