एक्स्प्लोर

शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या आदेशानंतर कॉलेज कँटिनमधील पार्टिशन हटवलं!

मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आदेशानंतर मुंबईतील एका कॉलेजच्या कँटिनमधील रोप पार्टिशन हटवण्यात आलं आहे. वांद्रे परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन अर्थातच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या कँटिनमधील रोप पार्टिशन टाकण्यात आलं होतं. कँटिनमध्ये मुलं आणि मुलींच्या बसण्याची वेगळी सोय करत पार्टिशन टाकण्यात आलं होतं. अखेर विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे आणि शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर हे पार्टिशन काढून टाकण्यात आलं आहे. काही मुलं मुलींची छेड काढत असल्याची तक्रार आल्यानंतर कँटिनमध्ये पार्टीशन टाकल्याचं पॉलिटेक्निकच्या प्राचार्या स्वाती देशपांडे यांनी सांगितलं. तसंच युनिफॉर्मची सक्तीही केली होती. मात्र हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी मध्यस्थी करत कॉलेज प्रशासनाला पार्टिशन हटवण्याचे आदेश दिले. तसंच मुलींवर कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेची सक्ती केली जाऊ नये, असे निर्देशही दिले आहेत. आता शिक्षणमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या पॉलिटेक्निकमध्ये मुला-मुलींना एकत्र बसण्याची मुभा देण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? मुंबईतील वांद्रे परिसरात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. काही दिवसांपूर्वी विनयभंगाची तक्रार आल्याचं कारण देत प्राचार्या स्वाती देशपांडेंनी कॉलेज कँटिनमध्ये पार्टिशन टाकलं. तसंच मुलींना शर्ट-ट्राऊझरऐवजी कुर्ता पायजमा वापरण्याच्या सूचना दिल्या. प्राचार्या देशपांडेंनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच मुलींना कँटिनमध्ये बसण्यास जागा कमी पडत असल्यानं पार्टिशन काढल्याचंही सांगितलं. मात्र या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला. अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडेंनीही याची दखल घेत कॉलेज प्रशासनाला पार्टिशन काढून टाकण्याचं आणि कुर्ता पायजम्याची सक्ती न करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare on Devendra Fadnavis|फडणवीसांचं सरकार आल्यावर दलित, अल्पसंख्याकांच्या अत्याचारात वाढ?Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्टSudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनरAkhilesh Shukla Kalyan | मराठी कुटुंबावर हात उगारण्याची हिंमत होतेच कशी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget