एक्स्प्लोर

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटींचा खर्च

महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधीची उधळपट्टी होताना दिसत आहे. 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. या सर्वाधिक खर्च थोरात आणि भुजबळांच्या बंगल्यांवर होत आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सारंग बंगल्याच्या डागदुजीसाठी तब्बल 92 लाख खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबई : सरकार कुठलंही असो तुमचा आमचा सामन्यांचा पैसा हमखास खर्च होतो. कारण मंत्र्यांना लागणारे चकचकीत बंगले, मंत्र्यांची दालनं यावर सध्या कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागानं 31 बंगल्यांसाठी निविदा काढल्या आहेत. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार त्यावर 15 कोटींचा खर्च होतोय. म्हणजे एका बंगल्यावर सध्या 80 लाख ते दीड कोटीपर्यंत उधळपट्टी सुरू आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागानं 31 बंगल्यासाठी निविदा काढल्या आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे निविदा सादर होण्याआधीच बंगल्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं बंगल्याची कंत्राटं देण्यास सुरुवात केली आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, एकूण 31 बंगल्यावर जवळपास 15 कोटींची उधळपट्टी सुरु आहे

- म्हणजेच साधरणत: एका बंगल्यावर 80 लाख ते दीड कोटीपर्यंत खर्च सुरु आहे. - सर्वात जास्त खर्च महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन आणि अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर होत आहे. - रॉयल स्टोनसाठी एक कोटी 81 लाख तर रामटेकसाठी एक कोटी 48 लाखांचा खर्च होत आहे.

आपण पाहुयात कोटींच्या घरात खर्च होत असलेले बंगले कुठले आहेत

रॉयल स्टोन : 1 कोटी 81 लाख रामटेक :- 1 कोटी 48 लाख मेघदूत :- 1 कोटी 30 लाख सातपुडा :- 1 कोटी 33 लाख शिवनेरी :- 1 कोटी 17 लाख अग्रधुत :- 1 कोटी 22 लाख ज्ञानेश्वरी :- 1 कोटी 1 लाख पर्णकुटी :- 1 कोटी 22 लाख सेवासदन :- 1 कोटी 5 लाख

रोहित पवारांच्या आमदारकीला आव्हान, चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा राम शिंदेंचा आरोप

यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सारंग बंगल्याच्या डागदुजीसाठी तब्बल 92 लाख खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या या उधळपट्टीवर विरोधी पक्ष तरी काय बोलणार?

भाजप सरकारच्या काळात बंगल्यांच्या खर्चावरून कॅगनं आढले होते ताशेरे - 14 एप्रिल 2016 ला राज्यातल्या सिंचन आणि इतर प्रकल्पांवर वाढलेल्या खर्चावर ताशेरे ओढल्यानंतर 'कॅग'च्या अहवालात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी गेल्या 5 वर्षात खर्चामध्ये 10 पट वाढ केल्याचं उघड झालं आहे. मलबार हिल येथील मंत्र्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीवर गेल्या 5 वर्षात तब्बल 52 कोटी रुपये खर्च केल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हे बंगले 40 वर्षांपेक्षा जुने असल्यानं त्यांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यापेक्षा त्यांची पुनर्बांधणी केली असती तर ती केवळ 37 कोटी रुपयांत झाली असती, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. अशाच प्रकारे मॅजेस्टिक आमदार निवासस्थान धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतरही त्याच्या देखभाल दुरुस्तीवर 9.20 कोटी रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे वारंवार पाठपुरावा होऊनही रुग्णालयं आणि पोलिसांच्या वसाहतींच्या दुरुस्तीकडे डोळेझाक केल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय.

2013 साली अजित पवारांनी दिली होती भरपाई, आता परत सर्व मंत्री भरपाई देणार का?

उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर असाच लांखोंचा खर्च करण्यात आला होता. माहिती अधिकारात ही बाब उघड होताच अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला 27 लाखांचा चेक दिला होता. आता अजित पवारांचा हाच आदर्श महाविकास आघाडीतले मंत्री घेणार का आणि सामान्य जनतेचा पैशांचा चुराडा वाचवणार का?

Metro 3 car shed | आरे कारशेडसाठी तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवावी : आदित्य ठाकरे | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तरTeam India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget