राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण, शासनातर्फे राजभवनात भावपूर्ण निरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसेच त्यांचे आभार मानले. राज्यपालांच्या पत्नी विनोदा यांना देखील यावेळी पुष्पगुच्छ देण्यात आला.

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण करत असलेले राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना आज शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसेच त्यांचे आभार मानले. राज्यपालांच्या पत्नी विनोदा यांना देखील यावेळी पुष्पगुच्छ देण्यात आला. यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्नीक हैद्राबादकडे रवाना झाले.
या छोटेखानी निरोप सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, प्रधान सचिव राजशिष्टाचार नंदकुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
नव्या राज्यपालांचा शपथविधी गुरुवारी
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झालेले राज्याचे नवे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी 6 वाजता राजभवन येथे होणार आहे.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















