एक्स्प्लोर

राज्याच्या पोलीस विभागात मोठे फेरबदल होण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासोबत ही चर्चा झाल्याचं कळतंय. नव्या नियुक्त्यांची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकार राज्याच्या पोलीस विभागात मोठे फेरबदल करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात राज्यात मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. ठाणे, पुणे, नागपूर, मीरा-भाईंदर आयुक्तांसह मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त तसेच अनेक आयजी रँक अधिकारी यांच्यांही बदल्या करण्यात येणार आहेत. यावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नाही यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम आदेश देतील असं कळतंय. गेल्या वेळी मुंबई डीसीपींच्या बदलीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी केवळ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासोबत ही चर्चा झाल्याचं कळतंय. नव्या नियुक्त्यांची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी चर्चा करून या यादीवर शिक्कामोर्तब करतील.

एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे या जागेसाठी नवीन पोलीस आयुक्तांचा विचार केला जात आहे. ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत जयजीत सिंह, कुलवंतकुमार सरंगल, बिपीन कुमार सिंह यांची नावं चर्चेत आहेत. तर राज्य गुप्तचर विभाग प्रमुखपदी विवेक फणसळकर यांचं नाव चर्चेत आहे. विद्यमान चीफ रश्मी शुक्ला यांना बढती देण्याची चर्चा आहे.

यासोबत पुणे पोलिसांचे विद्यमान आयुक्त व्यंकटेशम यांनीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार येथेही बदल करण्याची तयारी करत आहे. पुणे आयुक्त पदाच्या शर्यतीत अतुलचंद्र कुलकर्णी, राजेंद्रसिंह, रितेश कुमार, संजय कुमार यांची नावं आघाडीवर आहेत.

यासह नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांचीही बदली होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी बी पा सिंह यांचे नाव पुढे असल्याचं सांगितले जात आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्त पदासाठी यशश्वी यादव आणि सहआयुक्त कायदा व सुव्यवस्थेसाठी मिलिंद भारंबे यांच्या नावाची चर्चा आहे. तर नव्याने तयार झालेल्या मीरा भाईंदर आयुक्तालयासाठी सदानंद दाते यांचे नाव पुढे आहे. सदानंद दाते हे देखील राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख पदाच्या शर्यतीत आहेत.

यासोबतच आयजी स्तरावर मोठे फेरबदल करण्यास तयार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर येत्या काही दिवसात मोठ्या संख्येने राज्यात पोलीस उप-आयुक्तांच्या बदल्याही करण्यात येतील.

गेल्या आठवड्यात मुंबईतील 10 डीसीपींची बदली केल्याबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण झाला होता. असं म्हटले जात होते की राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता डीसीपी बदल्यांची यादी जारी केली. ज्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्या बदल्या थांबवण्यात आल्या आणि सात दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नवीन यादी देण्यात आली. या वेळेस मुख्यमंत्री स्वत:या मोठ्या बदली यादीवर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

Embed widget