एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकार अंगणवाडीच्या आवारात परस बागेची निर्मिती करणार
राज्यता आठ जिल्ह्यात रिलायन्सच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर असे दहा हजार मॉडेल राबवण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यात बालमृत्यू आणि कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडीच्या आवारात परस बाग निर्मितीची योजना राज्य सरकार सुरु करणार आहे. त्यासाठी महिला बालविकास विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन मध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यता आठ जिल्ह्यात रिलायन्सच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर असे दहा हजार मॉडेल राबवण्यात आले आहेत. या करारामधून आता राज्यभरात 25 हजार अंगणवाड्यांमध्ये परस बाग निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे.
अंगणवाड्यातील बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषणाची समस्या जाणवते. परस बागेत ताजी फळं, भाज्यांमधून बालकांना पोषण आहार मिळेल आणि कुपोषणाची समस्या कमी होईल, असा दावा महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement