एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा मार्ग अखेर मोकळा
वन्यजीव, पर्यावरण आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागांचीही परवानगी काही महिन्यांपूर्वीच पालिकेला मिळाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात (गोरेगाव-मुलुंड लिंक रोड) जीएमएलआरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : कोस्टल रोडपाठोपाठ महापालिकेचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या (जीएमएलआर) बांधकामातील सर्वात महत्त्वाचा अडथळा अखेर दूर झाला आहे. या प्रकल्पासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे पाच किलोमीटरचे दोन भूमिगत बोगदे बांधले जाणार आहेत. वन विभागाने त्यासाठी पालिकेला परवानगी दिली आहे.
वन्यजीव, पर्यावरण आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागांचीही परवानगी काही महिन्यांपूर्वीच पालिकेला मिळाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात जीएमएलआरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पश्चिम उपनगराला पूर्व उपनगराशी जोडण्यासाठी तसेच दोन्ही ठिकाणची वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी पालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा प्रकल्प हाती घेतला आहे.
पवईमार्गे कांजुरमार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) किंवा आरे कॉलनीमार्गे भांडुप असे सध्याचे पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी मार्ग असले तरी पवई आणि जेव्हीएलआरला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने मुंबईकरांचा वेळ आणि इंधनाची नासाडी होते. यावर पर्याय म्हणून पालिकेने जीएमएलआर हा प्रकल्प राबवण्याचे निश्चित केले आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जीएमएलआरचे 4.7 किमीचे दोन भूमिगत बोगदे जात असून त्यामुळे उद्यानातील वृक्षसंपदेला हानी पोहचणार असल्याचा दावा करत त्यास पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. मात्र निसर्गसंपदा तसेच वन्यजीवांना कोणतीही हानी न पोहचण्याची ग्वाही पालिकेने दिल्यानंतर वन्यजीव व वन विभागाने या प्रकल्पाला परवानगी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बॉलीवूड
Advertisement