एक्स्प्लोर
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या फाईल्स सुरक्षित: दिलीप कांबळे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून फाईल चोरी प्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्र झोंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून फाईल चोरी प्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्र झोंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.
इतकंच नाही तर चोरी करणारे चोरटे हे अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांचा भाऊ आणि त्याचे साथीदार असल्याचे समोर आले आहे.
या कार्यालयात चोरी झाली असली, तरी रमेश कदम यांच्या खटल्यावर परिणाम होणार नाही. कारण रमेश कदम यांच्यावर सीआडीने कारवाई करताना, महत्वाची कागदपत्रे आधीच ताब्यात घेतली आहेत, असं दिलीप कांबळे यांनी सांगितलं.
आज संध्याकाळी दिलीप कांबळे घटनास्थळी भेट देणार आहेत.
कार्यालयाचं कुलूप तोडून फाईल्सची चोरी
सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही 4 मजली इमारत आहे. या इमारतीच्या कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित फाईल्स आहेत. मात्र त्यापैकी काही फाईल्स चोरुट्यांनी पळवल्या.
महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून काही फाईल्स पळविण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, या फाईल्स साठे महामंडळ घोटाळ्याच्या आहेत की इतर हे कळू शकलं नाही.
आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे घोटळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.
काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा?
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.
– कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती
– उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं
– नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.
– अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या
– लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले
– महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले
– विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप
संबंधित बातम्या :
अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा : आतापर्यंत 250 कोटींची मालमत्ता जप्त
बीडमध्ये आरोपी रमेश कदमांची खास बडदास्त
आमदार रमेश कदमांची मुजोरी कायम, पुन्हा पोलिसाला शिवीगाळ आमदार रमेश कदम यांची 135 कोटींची संपत्ती जप्त करा : कोर्ट अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार, 3700 पानी पुरावे दिल्याचा लक्ष्मण ढोबळेंचा दावा महामडंळ घोटाळाप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश देणार: सामाजिक न्यायमंत्री अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची कहाणी... सीआयडी छळतं, मात्र तरीही कोठडी वाढवा, आमदार रमेश कदम यांची नौटंकी आमदार रमेश कदम यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी राष्ट्रवादीचे फरार आमदार रमेश कदम यांना ग्रँण्ड ह्यात हॉटेलमधून अटक! राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम फरार, पोलिसांची नाकाबंदी, कार्यकर्त्यांची आतषबाजी पोलिस स्टेशनवर दगडफेक: राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदमांची कोल्हापूर कारागृहात रवानगी सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या आ. रमेश कदमांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनवर दगडफेक अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवारही अडकू शकतात : दिलीप कांबळे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: आकृती डेव्हलपर्सचे मालकांना अटक महामडंळ घोटाळाप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश देणार: सामाजिक न्यायमंत्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामडंळाचे 80 कोटी गायब, 14 जण निलंबितअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement