एक्स्प्लोर
मुंबईकरांसाठी पुन्हा खुशखबर, म्हाडाची घरं 5 टक्क्यांनी स्वस्त
EWS आणि LIG गटातल्या घरांच्या किमती 5 टक्क्यांनी कमी होणार असून आता लागलेल्या लॉटरीतल्या विजेत्यांना देखील याचा लाभ होणार आहे. याआधी म्हाडाच्या घराच्या किंमतीत 25 ते 30 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती.
मुंबई : मुंबईकरांसाठी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा खुशखबर असून म्हाडाच्या घरांच्या किमती पुन्हा कमी होणार आहेत. म्हाडाच्या घराच्या किमती 5 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
EWS आणि LIG गटातल्या घरांच्या किमती 5 टक्क्यांनी कमी होणार असून आता लागलेल्या लॉटरीतल्या विजेत्यांना देखील याचा लाभ होणार आहे. याआधी म्हाडाच्या घराच्या किंमतीत 25 ते 30 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती.
नव्या दरांनुसार EWS घरांच्या किंमती 20 लाखांच्या खाली जाणार असून LIG घरांची किंमत 20 ते 30 लाखांपर्यंत येणार आहे.
कशी असणार सूट
HIG - रेडिरेकनरच्या किंमतीप्रमाणे 30 टक्के सूट
MiG - रेडिरेकनरच्या किंमतीप्रमाणे 40 टक्के सूट
LiG - रेडिरेकनरच्या किंमतीप्रमाणे 50 टक्के सूट
EWS - रेडिरेकनरच्या किंमतीप्रमाणे 70 टक्के सूट
बिल्डरकडून येणाऱ्या घरांना या लाॅटरीत फायदा होणार आहे. म्हाडाकडून बांधण्यात येणाऱ्या घरात 25 ते 30 टक्के मिळणार सूट असल्याने आता मुंबईकरांना आपल्या हक्काचे घर मिळवण्यासाठी आणखी कमी पैसे मोजावे लागणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement