एक्स्प्लोर
प्रेयसीने तरुणीवर बलात्कार घडवून व्हिडीओ बनवला
एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटेल असा प्रकार भिवंडीत घडला आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन तीन जणांना अटक केली आहे.
ठाणे : एका प्रेयसीने प्रियकराचा पिच्छा सोडवण्यासाठी दुसऱ्या प्रेयसीला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर एका नराधमाकरवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिली प्रेयसी एवढ्यावर थांबली नाही, तर तिने दुसऱ्या प्रेयसीवर बलात्कार होताना चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल केलं.
एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखा हा धक्कादायक प्रकार भिवंडीच्या गायत्रीनगर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पीडित तरुणीने कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रकरण झीरो नंबरने शांतीनगर पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलं.
पोलिसांनी दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्या प्रेयसीवरही बलात्काराचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सतिश उर्फ भीमराव नकलवार, सलीम मोईन खान असं बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत. तर राबिया असं बलात्काराचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात पीडित तरुणीचा चार वेळा गर्भपात झाल्याचा प्रकारही समोर आला आहे.
जबरदस्तीने शारीरिक संबंध, पीडितेचा चार वेळा गर्भपात
पीडित तरुणी मुंबईतील कफपरेड भागात राहणारी आहे. तिची काकी भिवंडीच्या गायत्रीनगर परिसरात राहते. मुंबईवरुन ती काकीच्या घरी सुट्टीच्या दिवशी भेटायला यायची. नेहमीप्रमाणे ऑगस्ट 2015 मध्ये ती भिवंडीत आली होती. त्यावेळी तिच्या मोबाईलचा रिचार्ज संपल्याने ती त्याच परिसरात एका मोबाईलच्या दुकानात रिचार्ज करण्यासाठी गेली असता तिची ओळख आरोपी सतिशसोबत झाली.
सतिशने ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर फिरण्याच्या बहाण्याने तो तिला लॉजवर घेऊन गेला. मात्र प्रियकराचं लग्न झालं असून त्याला दोन मुलं असल्याचं समजल्यावर पीडितेने प्रेमसंबंधास नकार दिला. मात्र तरीही सतिशने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.
या अत्याचारातून पीडिता दीड महिन्याची गरोदर राहिल्याने तिने प्रियकर सतिशला या घटनेची माहिती दिली. त्यावर त्याने पुन्हा प्रेमाचे नाटक करून तिला गर्भपात होण्यसाठी गोळ्या दिल्या. असा प्रकार 2015 ते जून 2018 पर्यंत वांरवार होणाऱ्या अत्याचारामुळे आणखी दोन वेळा तिचा आरोपी प्रियकराने गर्भपात केला.
पहिल्या प्रेयसीने बदला घेण्यासाठी बलात्कार घडवून आणला
दरम्यानच्या काळात सतीश याची पहिली प्रेयसी राबिया हिला दोघाचे प्रेमसंबध असल्याची कुणकुण लागली. तिने पीडित तरुणीला फोन करून आपले आणि सतिशचे प्रेमसंबध आधीपासून आहेत. यामुळे तू त्याचा नाद सोड असं सांगत तिच्याशी वाद घातला. तरीही पीडित तरुणी आपल्या प्रियकराशी शारीरिक संबध ठेवत असल्याचं तिला समजलं.
या प्रकारामुळे संतप्त झालेली राबिया पीडित तरुणीच्या घरी बुरखा घालून गेली. घरी जाताच तिने पीडितेला पाण्यातून गुंगीचं औषध पाजून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यावर नराधम सलीम करवी बलात्कार होतानाचा व्हिडीओ तिने शूट केला.
दुसऱ्या दिवशी आरोपी राबियाने हा व्हिडीओ पीडित तरुणीला दाखवला. त्यावेळी तिला धक्काच बसला. पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
यामुळे पीडितेने 43 हजार रुपये दिले. तरीही तिला धमकी देण्याचा प्रकार सुरुच होता. बदनामीच्या भीतीने पीडितेने खडवली नदीत आत्महत्या करण्याचं टोकाचं पाल उचललं. मात्र तिच्या एका मैत्रीणीने तिला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून कुलाबा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रसंगाचं कथन केलं.
यावर कुलाबा पोलिसांनी गुन्हा भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पीडित तरुणीला महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत घेऊन शांतीनगर पोलीस ठाणे गाठलं. बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तिघाही आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement