एक्स्प्लोर
मुंबई : तरुणीवरील चाकूहल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर
मुंबई : मुंबईतील ताडदेव भागात तरुणीवर झालेल्या चाकूहल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर या तरुणीनेच स्वतःवर चाकूहल्ला केला. पोलिस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईत काल (गुरुवार) रात्री ऑफिसवरुन परतत असताना अज्ञात इसमाने आपल्यावर चाकूहल्ला केल्याची तक्रार संबंधित तरुणीने केली होती. त्यानंतर या महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र पोलिसांच्या तपासात स्वतःच स्वतःवर चाकूहल्ला केल्याचं या 28 वर्षीय तरुणीने कबूल केलं. यासंदर्भातील कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
मुंबईत ऑफिसवरुन परतणाऱ्या महिलेवर हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement