एक्स्प्लोर
'गिरगावच्या राजा'वरुन राडा, मनसेने स. आयुक्तांच्या खुर्चीला हार घातला
गिरगांवच्या राजाचा गणेशमंडप तोडण्यासाठी पालिका प्रशासनाचे अधिकारी गेले होते. मात्र, त्यांना कारवाई करु दिली नाही. नोटीस न देताच अशा कारवाईला मंडळांचा विरोध आहे.

मुंबई: गिरगावात गणेशोत्सवातील कठोर नियमांवरुन मुंबई महापालिका प्रशासन आणि मनसे- शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला. मनसैनिकांनी डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या खुर्चीला कार्यालयाबाहेर आणून हार घातला. इतकंच नाही तर वॉर्ड ऑफिसमध्येही तोडफोड आणि गोंधळ केला.
गिरगांवच्या राजाचा गणेशमंडप तोडण्यासाठी पालिका प्रशासनाचे अधिकारी गेले होते. मात्र, त्यांना कारवाई करु दिली नाही. नोटीस न देताच अशा कारवाईला मंडळांचा विरोध आहे.
या सर्व गोंधळामुळे पोलिसांनी मनसे आणि शिवसेनेच्या 20-22 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिवसेनेचे गिरगांव येथील विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पालिकेचे गणेशोत्सवासाठीचे नियम आणि गणेशोत्सव मंडळांच्या हरकती
नियम-
मंडपाच्या बाजूला 10 फूट जागा सोडावी, फायर ब्रिगेड, अम्ब्युलन्स, पादचाऱ्यांसाठी जागा असावी.
मंडळांची हरकत
गिरगांवमध्ये चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये अशा पद्धतीनं मंडप उभारणे शक्य नाही.
नियम
मंडप उभारण्याआधीच बीएमसी, पोलिस, ट्रॅफीक, फायर ब्रिगेड यांचा परवाना घेणे आवश्यक.
हरकत- ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया किचकट आहे, नोंदणी आणि परवानग्या मिळण्यास वेळ लागतो, त्यामुळे एकीकडे ही प्रकिया सुरु असतानाच मंडळे मंडप उभारणीस सुरुवात करतात.
मंडपात फायर रेझिस्टंट सिस्टम असावी. मंडपाच्या बाहेर मंडपाच्या नकाशाचा आराखडा असणे आवश्यक
नियम
मंडपापासून 100 मी दूर भक्तांच्या गाड्यांचं पार्किंग
हरकत-- चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये पार्कींगसाठी जागा निर्माण करणे शक्य नाही
खड्डे जर खणले तर गणेशविसर्जनानंतर 10 दिवसांत बुजवले पाहिजेत. त्याचे फोटो महापालिकेला पाठवावे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
धुळे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
