एक्स्प्लोर

घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाच्या नामकरणाचा वाद! खासदार शेवाळेंकडून नवं स्पष्टीकरण

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला (Ghatkopar Mankhurd Link Road flyover)  गरीब नवाज ख्वाजा याचं नाव देण्याची मागणी केली होती.  त्या मागणीवरून शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

मुंबई :  शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला (Ghatkopar Mankhurd Link Road flyover)  गरीब नवाज ख्वाजा याचं नाव देण्याची मागणी केली होती.  त्या मागणीवरून शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. खासदार राहुल शेवाळे यांनी आज या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.  लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध प्रकारच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे, हे माझे कर्तव्य आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबतही तिथल्या स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले, असं खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी म्हटलं आहे. 

घाटकोपर-मानखूर्द रोडवरील फ्लायओव्हरला ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचं नाव द्या : खा. राहुल शेवाळे

शेवाळे म्हणाले की, घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला नेमके काय नाव द्यायचे, याचा अंतिम निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून घेतला जाईल.  सदर उड्डाणपुलाचे,  'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल' असे नामकरण करण्याची मागणी गेल्या वर्षीच केली होती, असा दावा खासदार मनोज कोटक यांनी केला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून त्यांच्या नावाला कोणताही विरोध करण्याचा प्रश्नच नाही. खासदार कोटक यांच्या मागणीबाबत याआधीच मला माहिती असती, तर नव्या नावाचा प्रस्ताव पुढे आलाच नसता. तसेच स्थानिक नगरसेवक विठ्ठलजी लोकरे यांनी सदर उड्डाणपुलाचे नाव 'वीर क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे' यांचे नाव द्यावे, अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे. याशिवाय काही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव सदर उड्डाणपुलासाठी सुचवले आहे, असं शेवाळे म्हणाले.

शेवाळे यांनी म्हटलं आहे की, यापैकी कोणाचाही प्रस्ताव माझ्याकडे न आल्याने मला याबाबत माहिती नव्हती. या सर्व महापुरुषांविषयी मला नितांत आदर आहे. मात्र, केवळ स्वार्थासाठी या साऱ्या प्रकरणाबाबत गैरसमज निर्माण करून, याला धार्मिक रंग देऊन अतिशय हीन राजकारण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, ही खेदाची बाब आहे.  या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात असंतोषाचे वातावरण तयार करणाऱ्यांना माझा इशारा आहे की जनता तुमच्या या स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाही, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक, गृहमंत्री फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांचं आता काय म्हणणे आहे?, संजय राऊतांचा सवाल
सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक, गृहमंत्री फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांचं आता काय म्हणणे आहे?, संजय राऊतांचा सवाल
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडींना वेग
Mumbai News : मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वरळीच्या NSCI डोममधील खळबळजनक घटना, मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वरळीच्या NSCI डोममधील खळबळजनक घटना, मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
Maharashtra Monsoon: आला रेss आला! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात मुसळ'धार', अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
आला रेss आला! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात मुसळ'धार', अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
Embed widget