एक्स्प्लोर

घाटकोपर इमारत दुर्घटना: शितपनं पिलरच हटवले, रहिवाशांचा आरोप

घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता ही इमारत का कोसळली याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई: घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कशी कोसळली याचं वास्तव आता हळूहळू समोर येतं आहे. इमारतीचे पिलरच काढून टाकल्यानं ही इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला असून अजूनही बचाव कार्य सुरु आहे. आरोपी सुनिल शितपनं नर्सिंग होमच्या नूतनीकरणावेळी चक्क इमारतीचे पिलर बाजूला काढून त्याठिकाणी लोखंडी रॉड लावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमारतीचे पिलर काढून त्या जागी लोखंडी रॉड लावण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रुग्णालयाचं नूतीनकरण करताना इमारतीच्या मूळ रचनेलाच धक्का लावण्यात आला होता. यावेळी पिलर तोडून लोखंडी रॉडनं आधार देण्यात आला होता. तसेच इमारतीच्या कॉलमलाही धक्का लावण्यात आल्यानं इमारत कोसळली असा दावा रहिवाशांनी केला आहे. आज (बुधवार) सकाळी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बरेच लोखंडी रॉड काढण्यात आले. दरम्यान, याबाबत आता सखोल चौकशी होणार आहे. यामध्ये ज्या कंत्राटदाराचा सहभाग होता त्याच्यावरही कारवाई होणार असल्याचं समजतं आहे. काय आहे नेमकी घटना? साईदर्शन ही इमारत 30 वर्षे जुनी होती. इथे राहणाऱ्या 17 जणांवर काल (मंगळवार) काळाने घाला घातला. इमारत अनधिकृत नव्हती : प्रकाश मेहता साईदर्शन इमारत अनधिकृत नव्हती. चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलं आहे. तसंच या विभागात अनेक इमारतींना ओसी नाही. महापालिकेने त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करावं, अशी सूचनाही त्यांनी केली. इमारतीला नोटीस नाही : महापौर या इमारतीला कुठलीही नोटीस दिली  नसल्याचं मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माहिती दिली. शिवाय दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. संबंधित बातम्या: मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली इमारत दुर्घटना : पत्नी आयसीयूत, चिमुरडी गमावली, आईचा पत्ता नाही घाटकोपर इमारत दुर्घटना : शिवसेनेच्या सुनील शितपला अटक ढिगाऱ्याखाली 15 तास मृत्यूशी झुंज, राजेश दोशी सुखरुप

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget