एक्स्प्लोर
भाजपच्या बिनशर्त माघारीमुळे गीता गवळींची पंचाईत?
मुंबई : महापालिकेच्या आखाड्यात 'तेलही गेलं आणि तुपही गेलं' या म्हणीचा खरा अर्थ कुणी अनुभवला असेल, तर सध्या तरी त्याचं उत्तर गीता गवळीच असल्याचं मिळेल. कारण, शिवसेनेची साथ सोडून भाजपसोबत आलेल्या गीता गवळी यांची महापौरपदाच्या लढतीतून भाजपच्या बिनशर्त माघारीमुळे चांगलीच पंचाईत झाली आहे.
वास्तविक, मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेचमध्ये सुरु होती. त्यात दोन्ही पक्ष अपक्षांना गळाला लावण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत होते. त्यात अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी भाजपच्या गळाला लागल्या.
यात त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन भाजपला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी भाजपकडून त्यांना स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाच्या अध्यक्षपदाचं आश्वासन मिळालं होतं.
मात्र, काल मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत भाजप मुंबई महापालिकेत कुठलीही निवडणूक लढणार नसल्याची घोषणा दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच केल्याने, गवळींची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे भाजपच्या माघारीमुळे सर्वात जास्त दु:ख कुणाला झालं असेल तर त्याचं सध्या तरी उत्तर गीता गवळीच म्हणावे लागेल.
संबंधित बातम्या
..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?
शिवसेना-भाजप एकत्र येतील, याची 200 टक्के खात्री : पाटील
उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी
महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement