एक्स्प्लोर
राज ठाकरेंना ‘गावाकडच्या गोष्टी’ आवडल्या, केळेवाडीची पोरं 'कृष्णकुंज'वर
एबीपी माझाने साताऱ्यातील केळेवाडीत जाऊन, ‘गावाकडच्या गोष्टी’च्या टीमशी संवाद साधला होता.
मुंबई: एबीपी माझाने दाखवलेली ‘केळेवाडी टू जोहान्सबर्ग’ या बातमीची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘गावाकडच्या गोष्टी’ या वेब सीरिजच्या सर्व कलाकारंची भेट घेतली.
ग्रामीण भागात यू ट्यूबसारख्या माध्यमाचा वापर करत, तरुणांनी ‘गावाकडच्या गोष्टी’ ही वेब सीरिज सुरु केली. या वेब सीरिजला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं आहे.
या वेब सीरिजमधील कलाकारांचा अभिनय आणि कथानक पाहून, यूट्यूबवर ‘गावाकडच्या गोष्टी’ हिट ठरत आहेत.
त्यांच्या याच कामाची दखल दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील मराठी मंडळाने देखील घेतली आहे. मराठी मंडळांने त्यांना जोहान्सबर्गला वेब सीरिजचा एक एपिसोड शूट करण्यासाठी निमंत्रीत केलं आहे.
दरम्यान, एबीपी माझाने साताऱ्यातील केळेवाडीत जाऊन, ‘गावाकडच्या गोष्टी’च्या टीमशी संवाद साधला होता. 29 मार्च रोजी प्रसारित झालेला हा भाग पाहून, राज ठाकरे यांनी या कलाकारांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement