एक्स्प्लोर

Gautam Navlakha Bail : शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी NIA ला तीन आठवड्यांची मुदत

Urban Naxalism Case: गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत एनआयएने त्यांना अटक केली होती.  

मुंबई: शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा (Gautam Navlakha Bail) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरीता 6 आठवडे स्थगितीची NIA ने मागणी केली आहे. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी अंशतः मान्य करून अंमलबजावणीसाठी तीन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. 

न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांच्या जामीनाचा आदेश दिला. 

या आधी जामीन फेटाळला होता

शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले विचारवंत गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप एनआयएने केला आहे. या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत असं निरीक्षण या आधी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं नोंदवून त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नवलखा यांना नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. 

नवलखा यांनी नियमित जामीनासाठी केलेला अर्ज विशेष एनआयए कोर्टानं नामंजूर केला होता. त्याला नवलखा यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. यावर पुन्हा सुनावणी घेत तातडीनं निकाल देण्याचे आदेश हायकोर्टानं एनआयए कोर्टाला दिले होते. त्यानुसार एनआयए कोर्टानं यावर नव्यानं सुनावणी घेत नवलखा यांचा जामीन पुन्हा फेटाळून लावला होता. 

नवलखांचे माओवाद्यांशी संबंध

नवलखा हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य होते असं निरीक्षण न्यायालयाने या आधी व्यक्त केलं होतं. देशासाठी लढणाऱ्या अनेक संरक्षक जवानांना या संघटनेनं ठार मारलेलं आहे. तपासयंत्रणेनं याबाबत दाखल केलेल्या आरोपपत्रातील कागदपत्रांवरुन नवलखा या संघटनेचे सक्रिय सदस्य होते असं दिसतंय. नवलखा यांच्याकडून अनेक कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आरोपपत्रात असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतंय की, नवलखा हे या गुन्ह्यात आणि कटकारस्थानातही सहभागी होते. याशिवाय अन्य आरोपींप्रमाणे ते शस्त्रास्त्र प्रशिक्षणातही सामील होते असं निरिक्षणही कोर्टानं नोंदवलं होतं.

काश्मिर मुक्त संघटनेचा सय्यद गुलाम नबी फई याच्यासोबत नवलखा यांचे संबंध असल्याचा आरोपही एनआयएनं केला आहे. 

नजरकैदेत असताना नवलाखा यांना इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, आयपॅड किंवा इतर कोणतंही संपर्काचं साधन वापरण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली होती. आरोपी नवलाखा यांना दिवसातून एकदाच 10 मिनिटांसाठी सुरक्षा रक्षकांनी दिलेला फोन वापरण्यास परवानगी होती. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget