एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भक्ती भावाने गौरी गणपतीचं विसर्जन, मुंबईतील चौपाट्यांवर गर्दी
मुंबईः लाडक्या बाप्पाची गेल्या 6 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात आला. गौरीसह बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर भाविकांनी एकच गर्दी केली.
पुढच्या वर्षी लवकरच या.. अशा जयघोषात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी चिमुकल्यांनीही जुहू, वर्सोवा आणि गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, पवई तलाव येथील विसर्जनस्थळी गर्दी केली.
सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तसेच किनारपट्टयांवर गर्दी होऊ नये, कचरा इतरत्र टाकू नये, यासाठी मुंबई महापालिकेनेही तयारी ठेवली होती. दरम्यान बाप्पाची सहा दिवस सेवा केल्यानंतर जड मनाने भक्तांनी बाप्पाला निरोप दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement