Gateway Of India : प्रवासी बोट उलटली, 15 मिनिटं पोहत होतो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'त्या' काही क्षणांचा थरारक अनुभव
Gateway Of India Boat Accident : गेटवे ऑफ इंडियाजवळ एका स्पीड बोटने धडक दिल्याने प्रवासी बोट बुडाली. त्या बोटीतील एका प्रत्यक्षदर्शीने अपघाताचा थरार एबीपी माझाला सांगितला.
Gateway Of India Boat Accident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ (Gateway Of India Boat Accident) एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घटना घडली. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाश्यांना वाचवण्यात यश आलं आहे. एका स्पीड बोटने या प्रवासी बोटीला धडक दिली आणि हा अपघात झाला आहे. नेमकं त्याक्षणी काय घडलं? बोट नेमकी कशी बुडाली? याबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाला सांगितलं आहे.
या बोटीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सध्या या घटनास्थळावरचं संपूर्ण बचावकार्य पूर्ण झालयं. पण अनेक गोष्टींचा उलगडा प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. या बोटीमध्ये अनेक लहान लहान मुलं होती, बोटीत पाणी आलं तेव्हा आम्हाला लाईव्ह जॅकेट देण्यात आलं, असं सगळं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
'मी 15 मिनिटं पोहोत होतो'
एबीपी माझासोबत बोलताना त्या प्रत्यक्षदर्शीने म्हटलं की, 'मी गेटवे ऑफ इंडियावरुन 3.30 वाजता ही बोट पकडली. जवळपास आम्ही 10 किलोमीटरचा प्रवास केला होता. तेवढ्यात ती स्पीड बोट आली आणि आमच्या बोटीला धडक दिली. तेवढ्यात आम्हाला ड्रायव्हरनेही लाईव्ह जॅकेट घालायला सांगितलं. मी बोटीच्या वर होतो, खाली येऊन लाईव्ह जॅकेट घालेपर्यंत संपूर्ण बोटीमध्ये पाणी आलं. बोट उलटली होती. मी पुन्हा बोटीच्या वर गेलो. जवळपास 15 मिनिटं पोहत होतो. तोपर्यंत दुसरी बोट आली आणि त्या बोटीने मला वाचवलं.'
अन् 'त्या' अर्ध्या तासांचा थरार
बोटीत किती जण होते? यावर बोलताना त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, 'बोटीत जवळपास 100 पेक्षा अधिक लोकं होते. लहान लहान मुलं आहेत,बरीच कुटुंब होती. आम्हालाही सुरुवातीला लाईव्ह जॅकेट दिलं नव्हतं. जेव्हा बोटीत पाणी यायला लागलं तेव्हा आम्हाला लाईव्ह जॅकेट देण्यात आलं. बोट बुडाल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटांनी बचाव कार्य सुरु झालं.'
बचावपथक जवळपास अर्ध्या तासाने आलं. पण ज्या बोटी आजूबाजूने जात होत्या, त्यातली एक बोट 15 मिनिटांत आली. स्पीड बोटमध्ये 8 ते 10 माणसं होती. ते धडक देतील हा विचार मी करत होतो की तेवढ्यात त्या स्पीड बोटने येऊन धडक दिली. त्याच बोटी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या बोटीतील एका व्यक्तीचा पाय तुटला, त्याच रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्याला आम्ही आमच्या बोटीमध्ये घेतलं.
ही बातमी वाचा :
Gateway of India : मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली; तिघांचा मृत्यू