एक्स्प्लोर

Gas cylinder blast in Dombivali : डोंबिवलीत गॅस सिलिंडरचा स्फोट, एक गंभीर जखमी

डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना   घडली आहे.

डोंबिवली :  डोंबिवलीच्या उमेश नगर परिसरात   गॅस सिलेंडरचे स्फोट (Gas cylinder blast in Dombivali) असल्याची माहिती समोर येत आहे. या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एक  व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहती  समोर आली आहे.  स्फोटात जखमी झालेल्या या व्यक्तीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना   घडली आहे. सुदैवाने यावेळी घरात कुणी नव्हते मात्र या स्फोटात घराचे नुकसान झाले आहे. दरम्यान जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंत मोरे असे जखमीचे नाव असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

डोंबिवली पश्चिम येथील उमेश नगर परिसरात राहणारे हनुमंत मोरे हे घरात एकटे राहतात.  सकाळी गॅसचा वास येत असल्याने ते  गॅस जवळ तपासणी करण्यासाठी गेले. तपासणी करत असताना त्यांनी गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला. गॅस पेटवताच अचानक स्फोट झाला. मोरे यांना  मुंबईच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .या स्फोटात घराचे पत्रे तुटून उडाले तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले आहे  . या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून स्फोटच  नेमकं कारण काय आहे याचा शोध पोलीस करत आहे.

गॅस वापरताना काळजी घ्या...

घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा.

इतर बातम्या :

Dombivali News : वाहतूक पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत, डोंबिवलीतील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget