एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईतील कचरा उचलणार नाही, कंत्राटदारांचा पालिकेला इशारा
मुंबईकरांना येत्या 27 जानेवारीपासून तुम्हाला कचऱ्याकोंडीचा त्रास सहन करावा लागू शकतो. याचं कारण कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेला 27 जानेवारीपासून कचरा न उचलण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : मुंबईकरांना येत्या 27 जानेवारीपासून तुम्हाला कचऱ्याकोंडीचा त्रास सहन करावा लागू शकतो. याचं कारण कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेला 27 जानेवारीपासून कचरा न उचलण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई महापालिकेनं कचरा घोटाळ्याप्रकरणी आठ कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. या कंत्राटदारांविरोधात चार महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेनं पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. कचऱ्यात डेब्रिजची भेसळ करण्याचा आरोप या नोटीसमध्ये लावण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेनं कारणे दाखवा नोटीस मागे न घेतल्यास 27 जानेवारीपासून कचरा उलणार नाही, असा इशाराच कंत्राटदारांकडून पालिकेला देण्यात आला आहे.
त्यामुळे आता ज्यांच्यावर कचरा घोटाळयाचा आरोप आहे, तेच कंत्राटदार मुंबईकरांना वेठीस धरण्याच्या तयारीत आहेत. आता यावर पालिका काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement