एक्स्प्लोर

... तर पवार साहेबांचाही बाप काढणार का? गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप, शरद पवार, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांवर केली होती. त्या टीकाला उत्तर देताना पवार साहेबांनीही पक्ष बदलले मग त्यांचाही बाप काढणार का? असा प्रतिसवाल गणेश नाईकांनी आव्हाडांना विचारला आहे.

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे. पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही (शरद पवार) अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.

एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार साहेबांची गणना देखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का? असा प्रतिप्रश्न गणेश नाईक यांनी केला आहे. त्या-त्या वेळेची गरज म्हणून पक्ष बदलले जातात, त्यामुळे अशी खालच्या स्थरावर टीका केली जाऊ नये, असंही गणेश नाईकांनी म्हटलं. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांचे जोरदार वाकयुद्ध सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप, शरद पवार : जितेंद्र आव्हाड

माझा बाप काढला याचं मला दुःख नाही. कारण, माझा एकच बाप आहे. गणेश नाईक यांनी सतत बाप बदलले, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. गणेश नाईक यांनी 1990 ला एक बाप, 2000 दुसरा तर, 2020 ला तिसरा बाप बदलल्याचं म्हटलं. अशी बाप बदलणाऱ्याची औलाद माझी नाही. माझा मरेपर्यंत एकच बाप आहे. जेव्हा गरीब आगरी समाजाची घरं पडत होती. त्यावेळी नाईक तुम्ही कुठं होता. ही घरं वाचवण्यासाठी सीमांकन का वाढवलं नाही?, स्वतःच बावखळेश्वर मंदिर वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढला. मग, गरीब आगरी समाजासाठी तुम्ही का लढले नाहीत, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले. ज्या समाजावर तुम्ही मोठं झालात त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? जे तुम्हाला मिळालं ते माझ्या बापामुळेच. कारण, शरद पवार माझा बाप आहे, असंही आव्हाड सांगायला ते विसरले नाहीत. गणेश नाईक यांनी आजपर्यंत फक्त पैशाच्या जीवावर राजकारण केलं. मात्र, मी निष्ठेच्या जीवावर राजकारण करतो. त्यामुळे नवीमुंबईची लढाई ही गद्दार विरुद्द निष्ठावंत अशी होणार असल्याचंही आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.

गणेश नाईक यांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट लिहीत गणेश नाईक, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला!, असं जाहीर आव्हान केलंय. "प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे." असल्याचं आव्हाड यांनी लिहलंय.

तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज.. : गणेश नाईकांचं जितेंद्र आव्हाडांना उत्तर

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणेतील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, "गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. नवी मुंबईतील कारखाने, दगड खाणींकडून ते खंडणी वसूल करत आहेत. भाजपने गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांना नवी मुंबईतून उमेदवारी दिली होती. मात्र वडील गणेश नाईक यांनी राजकीय महत्वाकांक्षेसाठी मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा बळी घेतला. असा व्यक्ती कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला होता.

जितेंद्र आव्हाडांना टीकेला प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी सिनेमाचा डॉयलॉग वापरला होता. ते म्हणाले होते की, "गणेश नाईकांचं नाव घेतलं तर आपलं भाषण ऐकतील असं काहींना वाटतं. ते भाषण ऐकण्यासाठी गणेश नाईकांचं नाव घेत आहेत. मी जो डायलॉग बोललो ती बाब खरी आहे. तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक". तसेच माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची केस दाखल नसून खंडणी मागितली नसल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं होतं.

Jitendra Awhad vs Ganesh Naik | आव्हाडांच्या 'खंडणीखोर' असल्याच्या टीकेला गणेश नाईकांचं उत्तर

गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, जितेंद्र आव्हाडांची टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget