एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2023 : पुढच्या वर्षी लवकर या! दीड दिवसाच्या बाप्पांना आज निरोप, प्रशासनाकडून ठिकठिकाणी तयारी

Ganesh Visarjan 2023 : आज दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेसह इतर ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी करण्यात आली आहे.

मुंबई :  मंगळवारी घरोघरी बाप्पांचे आगमन झाले. आज राज्यभरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचे आज विसर्जन (Ganesh Visarjan) होणार आहे. मुंबईत महापालिकेच्यावतीने (BMC) गणेश विसर्जनाची (Ganesh Immersion) तयारी करण्यात आली आहे. कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक नैसर्गीक विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. राज्यातही विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनांकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी केली आहे. तर, दुसरीकडे गणेश भक्तांकडून बाप्पांना वाजत, गाजत निरोप देण्यात येत आहे. 

मुंबई महापालिकेने प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना या कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीला स्वयंवसेवी संस्थादेखील आहेत. त्याशिवाय, विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. 

स्टिंग रे, जेलीफिश पासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान मुंबईच्या समुद्र किनारी स्टिंग रे, जेलीफिशच आढळून येतात. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी समुद्र किनारी येणाऱ्या गणेश भक्तांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. 

कृत्रिम तलावाकडे ओढा

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिड दिवसांच्या 129  सार्वजनिक आणि 21,101 खाजगी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. यंदा ही वसई विरार पालिकेने पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात प्रत्येक विभागात 105 कृत्रिम तलाव तयार केले आहेत.  नागरीक कृत्रिम तलावाला पसंती देत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना साश्रु नयनांनी निरोप देण्यात आला. पारंपरिक पद्धतीने, ढोल ताशांच्या गजरात हा निरोप देण्यात आला. तलाव, नदी, विहीर आदी ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. 

गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल 

19 ते 29 सप्टेंबर 2023 या दरम्यान साजरा करण्यात येणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण शहरात वाहतूक रहदारीत वाढ होत असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. 

गणेश विसर्जनाचा मुहूर्त काय?

 गणेश विसर्जन (दीड दिवस) मुहूर्त - 20 सप्टेंबर - दुपारी 3.18 ते संध्याकाळी 6.18
7.49 रात्री - 12.15 मध्यरात्री, 21 सप्टेंबर
3.12 पहाटे - 4.40 पहाटे, 21 सप्टेंबर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Embed widget