एक्स्प्लोर
दारुच्या ग्लासमध्ये पाणी टाकण्यावरुन वाद, मित्राची हत्या
अच्युतम चौबे हा भाईंदर पूर्वेच्या ओस्तवाल निकेतन इमारतीमध्ये राहतो. तो त्याच परिसरात चायनीजचं दुकानही चालवत होता. नवघर पोलिसांनी संदिप गवसवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रातिनिधिक फोटो
ठाणे : दारुचं व्यसन किती वाईट हे भाईंदरमधील एका घटनेवरुन समोर आले आहे. दारु पिताना ग्लासमध्ये पाणी टाकण्यावरुन झालेल्या वादातून मित्राचीच हत्या केली. आरोपी संदिप गवसला पोलिसांनी अटक केली आहे.
‘सॅटर्डे पार्टी’ मनवणाऱ्या तिघा जीवाभावाच्या मित्रांमध्ये किरकोळ वादावरुन भाईंदरमध्ये एकाची हत्या झाली. भाईंदर पूर्वेच्या बालाजी इंडस्ट्रीयलच्या मागे ओस्तवाल निकेतन इमारतीजवळ रविवारी रात्री अच्युतम चौबे, आरोपी संदिप गवस आणि जखमी विवेक सिंह हे दारु पित बसले होते.
दारुची नशा चढल्यावर आरोपी संदिपने अच्युतमला दारुच्या ग्लासमध्ये पाणी टाकायला सांगितले. त्यावरुन मित्रांमध्ये वाद झाले आणि आरोपी संदिपनं दांडक्याने अच्युतमला जीवानीशीच मारुन टाकले. अच्युतमला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेक सिंह हाही यात जखमी झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना जवळच्या सीसीटीव्हीवरुन घटनेच्या दिवशीची हकीगत कळली आणि आरोपी संदिपला बेड्या ठोकल्या.
अच्युतम चौबे हा भाईंदर पूर्वेच्या ओस्तवाल निकेतन इमारतीमध्ये राहतो. तो त्याच परिसरात चायनीजचं दुकानही चालवत होता. नवघर पोलिसांनी संदिप गवसवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
