एक्स्प्लोर
अंगारकीनिमित्त सिद्धीविनायक मंदिरात खास व्यवस्था, मोफत बससेवा
सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे भक्तांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन मार्गिका ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून दर्शन लवकर आणि सुरळीत होईल.
मुंबई : अंगारकी संकष्टी चतुर्थीला उद्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्तांची गर्दी होते. यासाठी सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे भक्तांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन मार्गिका ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून दर्शन लवकर आणि सुरळीत होईल.
दर्शन रांगेचा मार्ग
पुरुषांसाठी - रवींद्र नाट्य मंदिरापासून सुरू
महिलांसाठी - दत्ता राऊळ मैदानापासून व्यवस्था
गर्भवती महिला, दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी - पेट्रोल पंपाच्या समोरच्या गेटमधून प्रवेश
दुरून दर्शन घेणाऱ्यांसाठी - पोर्तुगीज चर्चच्या फुटपाथपासून, त्यासोबतच, रेल्वेने येणाऱ्या भक्तांसाठी एलफिन्स्टन आणि दादर रेल्वे स्थानकापासून बेस्टची विनामूल्य सेवा मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे.
दर्शनाची वेळ :
आज (३ एप्रिल) मध्यरात्री पूजेनंतर रात्री दीड वाजल्यापासून ते उद्या (४ एप्रिल) रात्री 3 वाजेपर्यंत दर्शनासाठी प्रवेश सुरू राहील. नैवद्य आणि मधल्या आरतीचा वेळ सोडल्यास 24 तास दर्शन सुरू राहणार.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement