एक्स्प्लोर
दोन उकडलेल्या अंड्यांचं बिल फक्त 1700 रुपये, मुंबईतील हॉटेलची कमाल
दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत फार-फार तर 30 रुपये असू शकेल. मात्र फोर सीझन हॉटेलने तब्बल 1700 रुपये आकारुन सगळ्यांनाच तोंडात बोट घालायला लावलं.

मुंबई : अभिनेता राहुल बोसला दोन केळ्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलने 442 रुपये आकारल्याचं प्रकरण ताजं असताना, आणखी एका फाईव्ह स्टारने अशीच करामत केली आहे. मुंबईतील फोन सीझन्स हॉटेलमध्ये दोन उकडलेल्या अंड्यांसाठी तब्बल 1700 रुपये बिल आकारण्यात आलं. कार्तिक धर नावाच्या एका लेखकाने या बिलाचा फोटो ट्वीट करुन अभिनेता राहुल बोसलाही टॅग केलं आहे. 'भावा आंदोलन करुया का,' असा गंमतीशीर प्रश्नही केला. दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत फार-फार तर 30 रुपये असू शकेल. मात्र फोर सीझन्स हॉटेलने तब्बल 1700 रुपये आकारुन सगळ्यांनाच तोंडात बोट घालायला लावलं. एवढंच नाही तर बिलावर दोन ठिकाणी ऑम्लेटचे वेगवेगळे दर आकारल्याचं दिसतं. दोन ऑम्लेटची किंमत 1700 रुपये तर एका ऑम्लेटची किंमत 850 रुपये दिसते.
कार्तिक धरने हा फोटो ट्वीट केल्यानंतर तो तुफान शेअर होऊ लागला. दरम्यान, या प्रकरणावर हॉटेलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनेक युझर्सनी फोर सीझन्स हॉटेलची फिरकी घेतली. डायनासॉरची अंडी उकडून दिली होती का, असा प्रश्न एकाने विचारला आहे.2 eggs for Rs 1700 at the @FourSeasons Mumbai. @RahulBose1 Bhai Aandolan karein? pic.twitter.com/hKCh0WwGcy
— Kartik Dhar (@KartikDhar) August 10, 2019
GOT मधल्या ड्रगनचं अंडंही यापेक्षा स्वस्त असतं.bhaisahab dinosaur ke ande boil kar ke de diye kya? 😂😂😂
— उधेड़-बुन (@UrbanZameendar) August 10, 2019
राहुल बोसला दोन केळ्यांसाठी 442 रुपयांचं बिल नुकतंच चंदीगडमधील जेडब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये अभिनेता राहुल बोसला दोन केळ्यांसाठी 442 रुपये आकारण्यात आले होते. हॉटेलच्या बिलाचा फोटो राहुल बोसने ट्विटरवर पोस्ट केला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि हॉटेलविरोधात जीएसटी कलम 11 चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. तसंच हॉटेलला 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.Even the dragon eggs in GOT might be cheaper
— Ajay Kamath (@ajay43) August 11, 2019
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























