एक्स्प्लोर

ठाण्यातील भोईर कुटुंबातील शिवसेनेचे चारही नगरसेवक नाराज

महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भोईर परिवाराने या वादानंतर थेट एकनाथ शिंदेंना शह देण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय.

ठाणे : महापौरांनी सभागृहात बोलू न दिल्याने ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे चार नगरसेवक नाराज झाले आहेत. शिवसेनेत येऊन आपण पस्तावलो असल्याचे नाराज नगरसेवक देवराम भोईर यांनी म्हटले आहे. नेमकं काय घडलं? ठाणे महापालिकेच्या महासभेत आज सलग दुसऱ्या दिवशी वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर हे शिक्षण मंडळाच्या विषयावरून बोलायला उभे राहिले असता 'तुम्हाला काही माहित नाही, तुम्ही गप्प बसा' असं म्हणत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना टाळलं. त्यामुळे कमालीच्या नाराज झालेल्या देवराम भोईर यांच्यासह त्यांचे सुपुत्र नगरसेवक संजय भोईर, नगरसेवक सून उषा भोईर आणि पुतण्या नगरसेवक भूषण भोईर यांनी सभात्याग केला. ज्येष्ठ नगरसेवक असूनही महापौरांनी आपला अपमान केल्याची देवराम भोईर यांची भावना असून याबाबत तक्रार करण्यासाठी देवराम भोईर यांच्यासह त्यांच्या परिवारातील चारही नगरसेवक मातोश्रीवर निघाले आहेत. याच महासभेत काल पहिल्या दिवशी स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादीने महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही स्वपक्षीय नगरसेवकांच्याच नाराजीला महापौरांना सामोरं जावं लागलं आहे. देवराम भोईर हे ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. सेनेत येऊन पस्तावलो सभागृहातल्या वादावेळी भोईर परिवारातील या नगरसेवकांचा सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याशीही वाद झाला. यावेळी आपण शिवसेनेत प्रवेश करून पस्तावलो असल्याचं वक्तव्य करत मातोश्रीवर जाऊन राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य देवराम भोईर यांनी केलं. थेट एकनाथ शिंदेंना शह? महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भोईर परिवाराने या वादानंतर थेट एकनाथ शिंदेंना शह देण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget